तुळापूर येथील हॉटेल मालकावर गुन्हा दाखल

वाघोली – बिल थकविल्याने वीज पुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या पथकाला धक्काबुक्की करून शिवीगाळ करणाऱ्या तुळापूर येथील हॉटेल मालकावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पेरणे विभागाचे सहाय्यक अभियंता अंकुश शिवाजी मोरे यांनी लोणीकंद पोलिसात फिर्याद दिली आहे.
तुळापुर येथील रामराज्य हॉटेलचे वीस हजार रुपयाचे महावितरणचे बिल थकीत आहे. पेरणे महावितरण विभागाअंतर्गत तुळापूर येत असल्याने सहाय्यक अभियंता अंकुश मोरे यांनी हॉटेलचे मालक मनोज कनिच्छे आणि अनिल कनिच्छे यांना थकीत बिल भरण्यास वारंवार सांगून अनेकवेळा मुदतवाढ दिली होती. कनिच्छे यांच्याकडून बिल भरण्यात चालढकल होत असल्याने मोरे हे स्वतः तीन कर्मचाऱ्यांसह हॉटेलचा वीज पुरवठा खंडित करण्यासाठी दाखल झाले होते. यावेळी उपस्थित अनिल कनिच्छे यांनी मोरे यांना धक्काबुक्की करून इतर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी केली. त्याचबरोबर कनिच्छे हातात दगड घेवून पथकाच्या अंगावर धावून देखील गेले. या प्रकारानंतर मोरे यांनी याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यामध्ये सरकारी कामात अडथळा आणल्याची फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)