मानाचा चौथा गणपती : तुळशीबाग मंडळ

यंदाचे मंडळाचे वर्ष ११८ वे 


मिरवणुकीस प्रारंभ सकाळी ९.३० वाजता 


श्रींची प्राणप्रतिष्ठापना दुपारी १२.३० वाजता 

मानाचा चौथा म्हणून ओळख असलेल्या तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळाचे स्थान आहे. यंदा मंडळ 118 वर्षे साजरे करीत आहे. तुळशीबाग मंडळाच्या “श्री’ प्राणप्रतिष्ठा गुरूवारी दुपारी साडेबारा वाजता केली जाणार आहे. अक्‍कलकोट स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेजेय राजेभोसले यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होईल. याप्रसंगी या मंडळाची “श्री’ची मिरवणुक निघणार आहे. यावर्षी 5 किलो चांदीची पादुका चढविण्यात येणार आहे. यंदाही दिमाखदार देखावा राहणार आहे.

लक्ष्मी रस्त्यावरील वर्दळ पाहता मंडळाने मिरवणूक काढताना वाहुतकीच्या मार्गात बदल केले आहे. सकाळी साडेनऊ वाजता मिरवणुकीस सुरुवात होईल. गणपती चौक, नूमवी शाळा, अप्पा बळवंत चौक, फरासखाना, समाधान चौक, गणपती चौक असा मिरवुणकीचा मार्ग असेल. गणेशोत्सवात एक दिवस नियोजन व व्यवस्थापन महिला करणार आहेत. यात आरती, अर्थवशिर्ष, विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. सायंकाळी कर्तृत्ववान महिलांचा गौरव होईल. मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर, उपाध्यक्ष विनायम कदम, कार्याध्यक्ष विकास पवार आणि कोषाध्यक्ष म्हणून नितीन पंडित मंडळाचे कार्य पाहत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)