तुळशीबागेत लवकरच सीसीटीव्ही बसविणार – महापौर मुक्ता टिळक

पुणे- तुळशीबागेत व्यापाऱ्यांची संख्या वाढल्याने कोणाचाच व्यवसाय योग्य रितीने होत नसल्याचे दिसते. रस्त्यावरची गर्दी, दुकानामध्ये येणाऱ्या नागरिकांची गर्दी त्यामुळे लोकांना चालायला देखील त्रास होताना दिसत आहे. या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जागा आखून दिल्या, स्टॉलवाल्यांना उपाययोजना करून दिल्या तर नक्कीच सर्व व्यावसायिक एकत्रितपणे चांगला व्यवसाय करू शकतील. या भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून यासाठी सीसीटिव्ही बसविणे गरजेचे आहे. सीसीटिव्हीचा उपयोग अतिक्रमण विभागाला देखील होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर या भागात सीसीटिव्ही बसविण्यात येतील, असे आश्वासन महापौर मुक्ता टिळक यांनी दिले.
छोटे व्यावसायिक असोसिएशन पुणे शहर (जिल्हा) यांच्या वतीने जागतिक व्यापार दिनानिमित्त तुळशीबागेतील ज्येष्ठ व्यापारांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन तुळशीबाग येथे करण्यात आले होते. त्यावेळी शिल्पकार विवेक खटावकर, नगरसेवक राजेश येनपूरे, हेमंत रासने, महापालिका अतिक्रमण प्रमुख माधव जगताप, रूपाली पाटील-ठोंबरे, नितीन पंडित, विनायक कदम, अरविंद तांदळे, प्रदिप इंगळे, योगेश मारणे, सागर दहीभाते, योगेश ठोंबरे, सुनील जाधव, संतोष म्हस्के आदी उपस्थित होते.
टिळक म्हणाल्या, आपल्या परिसरातील त्रुटी, विकासाची कामे, समस्या याबाबत व्यावसायिक एकत्रित येऊन महानगरपालिकेला कशाप्रकारे मदत करू शकतील हे पाहिले पाहिजे. व्यावसायिकांच्या टॅक्‍स संदर्भातल्या अपेक्षा, व्यवसायाच्या जागेसंदर्भातील समस्या व्यावसायिकांनी पालिकेकडे दिल्यास पालिका त्यादृष्टीने नक्कीच मदत करेल. प्रत्येक व्यावसायिकाने आपला व्यवसाय सुयोग्य कसा करता येईल, हे पाहणे गरजेचे आहे.
नितीन पंडित म्हणाले, दुकानदार, छोटे व्यापारी, पथारीवाले या सर्वांमध्ये समन्वय साधण्यासाठी तुळशीबाग विकास समन्वय समितीची स्थापना करण्यात येणार आहे. या समितीद्वारे व्यापाऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तुळशीबाग ही राज्यातील आदर्श तुळशीबाग व्हावी यासाठी प्रयत्न करु, असेही त्यांनी सांगितले. तुळशीबाग विकास समन्वय समिती, तुळशीबाग छोटे व्यावसायिक असोसिएशन, तुळशीबाग व्यापारी असोसिएशन यांनी उपक्रमात सहभाग घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)