तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात कार्यशाळा

जळोची- एकविसाव्या शतकातील भारत स्मार्ट सिटीकडे वळत असताना समाजातील युवती देखील “स्मार्ट गर्ल’ म्हणून पुढे आल्या पाहिजेत आणि हिच या शतकाची मोठी भरारी असेल. या उद्देशानेच भारतीय जैन संघटना आणि अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय “स्मार्ट गर्ल’ कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेत जयश्री साळुंखे, डॉ. मेधा शहा, माधुरी कुलकर्णी यांनी युवतींना मार्गदर्शन केले. नगरपरिषदेच्या सदस्या डॉ. सई सातव प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरुमकर होते. प्रा. वैशाली पोळ यांनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. वैशाली माळी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन केले होते. आरती खोत आणि सोनल ब्राम्हणकर यांनी सूत्रसंचालन केले तर नीता गावडे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)