तुलू संघटनेच्या शहराध्यक्ष पदी हरीश शेट्टी बिनविरोध

चिंचवड – राज्यातील तुलू भाषिकांची संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुलू संघटनेच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष पदी हरीश शेट्टी यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली.
फेडरेशनचे हे आठवे वर्षे आहे. कर्नाटक राज्यातील तुलू भाषिकांची ही संघटना असून वंचित, दुर्बल, विधवा महिला तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्य करते. पिंपरी-चिंचवड शहरातील हॉंटेल व्यावसायिक हरीश शेट्टी यांची एकमताने शहराध्यक्ष पदी निवड झाली. ही निवड पुढील दोन वर्षासाठी असणार आहे. शहरातील सर्व तुलू बांधव तसेच गरजू घटकांना एकत्र घेऊन काम करणार असल्याचे हरीश शेट्टी यांनी सांगितले. निवडीनंतर अनेकांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. शहर हाॅटेल असोसिएशनचे अध्यक्ष पद्मनाभ शेट्टी तसेच उपाध्यक्ष राकेश शेट्टी यांनी हाॅटेल असोसिएशनतर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)