तुला फक्‍त दिवाळीत अस्थमा होतो का ?

सिगारेट ओढणाऱ्या प्रियंका चोप्राला नेटकऱ्यांचा सवाल

मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री प्रियांका चोप्राने नुकताच तिचा 37 वा वाढदिवस साजरा केला. लग्नाच्या नंतरचा प्रियांकाचा हा पहिलाच वाढदिवस होता. प्रियांकाचा वाढदिवस खास असावा यात पती निक जोनसने पुर्ण तयारी केली होती त्यामुळे तिचा हा वाढदिवस कायम स्मरणात राहणारा ठरला. परंतू, आणखी एका कारणाने तिचा वाढदिवस लक्षात राहणार ठरला. ते म्हणजे नेटीझन्सनी घेतलेली शाळा. कारण प्रियंकाचे वाढदिवसाचे काही फोटो सोशलमीडियावर व्हायरल झाले मात्र त्यात ती सिगरेट ओढतानाचा दिसत आहे. यावरूनच ती सध्या ट्राल हेत आहे. खरं तर सोशल मीडियावर ट्रोल होणं तिच्यासाठी नवीन नाही मात्र यावेळी सिगरेट ओढताना हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिला टार्गेट केलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये प्रियांका चोप्रा तिचा पती निक जोनस आणि आई मधू चोप्रा यांच्या सोबत एका बोटमध्ये बसली असून यावेळी हे तिघंही सिगरेट ओठताना दिसत आहेत. यावरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. प्रियंका चोप्राला फक्‍त दिवाळीतच अस्थमा होतो का असा सवाल केला आहे. तर दुसऱ्या एका युझरने तिला भारतीय संस्कृतीची आठवण करून देत आईसोबत बसून सिगारेट ओढताणा तुला लाज वाटत नाही का असेही म्हटले आहे. दरम्यान, प्रियंका चोप्रा ही तिच्या सिगारेट ओढतानाच्या फोटोमुळे ट्रोल होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)