“तुला कळणार नाही’साठी सुबोध-सोनालीने वाढवले वजन

पोस्टरगर्ल सोनाली कुलकर्णी आणि चतुरस्त्र अभिनेता सुबोध भावे हे दोघे प्रथमच “तुला कळणार नाही’ या सिनेमाद्वारे एकत्र काम करीत आहेत. प्रत्येक नवरा-बायकोच्या नात्याचे कंगोरे पडताळून पाहणाऱ्या या सिनेमासाठी सुबोध आणि सोनालीने आपले वजन वाढवले होते.

लग्न होऊन पाच-सहा वर्ष झालेल्या दाम्पत्यांची भूमिका त्यांना या सिनेमात वठवायची असल्याकारणामुळे, दिग्दर्शक स्वप्ना वाघमारे जोशी यांनी दोघांना वजन वाढवण्यास सांगितले होते. भूमिकेतील पात्राची गरज म्हणून तसे करणे आवश्‍यक असल्याकारणामुळे, नाईलाजास्तव का असेना या दोघांना वजन वाढवावे लागले होते. या सिनेमाचा ट्रेलर पाहताना सुबोध सोनालीचे वाढलेले वजन स्पष्ट दिसून येतात.

विशेष म्हणजे, या सिनेमातील सोनालीचा लूक तिच्या चाहत्यांना अवाक करून सोडतो. कारण यात ती कमालीची वेगळी दिसत असून, तिचा ब्लंक कटदेखील लक्ष वेधून घेतो. मुळातच सोनाली म्हंटली तर, तिचे लांब काळेभोर केस आणि कमनीय बांधा डोळ्यासमोर येतो. मात्र या सिनेमात वजन वाढवण्याबरोबरच तिने तिच्या लांब केसांवर कात्रीदेखील फिरवली. असे असले तरी, मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड आणि ब्युटीफुल नायिकांमध्ये गणली जाणा-या सिनेमाचे चित्रीकरण संपल्यानंतर आपले वजन पुन्हा घटवले आहे. शिवाय सुबोधने देखील नियोजित पथ्यपाणी करत स्वतःला पूर्ववत आणले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)