तुलसी विवाहांमुळे पूजा साहित्याला मागणी

पिंपरी-दिवाळी संपल्यानंतर आता तुलसी विवाहाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या विवाहाकरिता आवश्‍यक असलेल्या पूजा साहित्याला मागणी वाढली आहे. शहराच्या विविध ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये हे साहित्य विक्रीस उपलब्ध आहे.
तुळशीच्या माध्यमातून भगवंताला आवाहन करण्यासाठी तुलसी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. कार्तिक शुक्‍ल पक्षातील एकादशीपासून तुलसी विवाह उत्सवाचे आयोजन करण्यात येते. कार्तिकी एकादशी ते कार्तिकी पौर्णिमा अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत हा तुलसी विवाह उत्साहात साजरा करण्यात येतो.

तुळशीचा विवाह सर्वत्र गोरज मुहूर्तावरच साजरा केला जातो. सूर्यास्ताची निश्‍चित वेळ माहिती नसल्याने सायंकाळी 6.30 ही प्रमाण वेळ मानून या विवाह सोहळ्याला सुरुवात करण्यात येतो. हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतीने सामान्य व्यक्‍तीच्या लग्न सोहळ्याप्रमाणेच तुळशीचा विवाह समारंभ संपन्न होतो. पिंपरी-चिंचवड शहरातही विविध मंडळांकडून तुलसी विवाहाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे. प्रथा-परंपरा पाळत दारासमोरील, सोसायटी व चाळींमधील तुळशींच्या विवाहाचे कार्यक्रम सुरु झाले आहेत.

-Ads-

तुलसी विवाहाकरिता लागणारे ऊसाचे बाड 20 ते 30 रुपये, विड्याची पाने 60 रुपये शेकडा तर पूजा साहित्याचे एकत्रित साहित्य 50 रुपयांपासून बाजारात उपलब्ध आहे. तुलसी विवाहाची धामधूम असल्याने या साहित्याला मागणी वाढली आहे.
-गणेश आहेर
विक्रेता, पिंपरी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)