तुर खरेदी केंद्र बंद करणार नाही – सुभाष देशमुख

सुभाष देशमुख : मुदतवाढीसाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा
खासगी व्यापाऱ्यांना तूर न विकण्याचे आवाहन

मुंबई – शेतकऱ्यांची तुर खरेदी केल्याशिवाय राज्यातील खरेदी केंद्र बंद करणार नाही. लवकरच तुर खरेदीला मुदतवाढ मिळणे अपेक्षीत असुन शेतकऱ्यांनी तुर खरेदीबाबत आश्वस्त राहावे. शेतकऱ्यांनी आपल्याकडील तूर कमी भावाने खासगी व्यापाऱ्यांना विकू नये, असे आवाहन पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.

तूर खरेदीला मुदतवाढ मिळण्यासाठी आज पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिल्ली येथे केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह व केंद्रीय कृषि राज्यमंत्री शेखावत यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील तूर खरेदीच्या सद्य स्थितीबाबत चर्चा केली. यावेळी राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल उपस्थित होते. केंद्रीय कृषीमंत्र्यांशी या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असुन तुर खरेदीला मुदतवाढ देण्यास केंद्र शासन अनुकूल आहे. शेतकऱ्यांची तूर खरेदी केल्याशिवाय खरेदी केंद्र बंद करण्यात येणार नाही असे पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. या बैठकीला केंद्रीय सचिव पटनायक,नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक चढ्ढा व इतर अधिकारी उपस्थित होते.

राज्यात यावर्षी 1 फेब्रुवारीपासुन हमीभावाने तुर खरेदीला सुरवात झाली. खरेदीचा विहीत कालावधी संपल्यानंतर 15 मे पर्यत केंद्र शासनाने मुदतवाढ दिली होती. मात्र आणखी तूर शिल्लक असल्यामुळे केंद्रशासनाकडे सतत पाठपुरावा सुरू होता, यावर्षी 15 मे पर्यत 193 खरेदी केंद्रावर 33 लाख 15 हजार 132 किवंटल तुर खरेदी झाली आहे. शेतकऱ्यांची तुर खरेदी होण्यासाठी प्रयत्न सुरू असुन केंद्र शासनाने मुदतवाढ देण्यास अनुकूलता दर्शवली आहे. लवकरच मुदतवाढीचे आदेश काढण्यात येणार असून शेतकरी बांधवांनी आपल्याकडील तूर कमी भावाने खाजगी व्यापाऱ्यांना विकू नये, असे आवाहन सुभाष देशमुख यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)