तुरूंग अधिकाऱ्यांवर गोळीबार करणाऱ्या चौघांना पोलीस कोठडी

पुणे- तुरुंग अधिकारी मोहन पाटील यांच्यावर गोळीबार केल्याच्या प्रकरणात येरवडा पोलिसांनी अटक केलेल्या चौघांना 17 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गजानन नंदनवार यांनी हा आदेश दिला आहे.
नीलेश ऊर्फ तात्या संभाजी वाडकर ( वय 34, रा. जनता वसाहत विठ्ठल मंदिरामागे पर्वती, दत्तवाडी), कुणाल नितीन कानडे ( वय 25 रा. शास्त्री चौक, भोसरी), ऋषीकेश राजेश चव्हाण ( वय 19 रा. खोपडेनगर, कात्रज), ओंकार चंद्रकांत बेलुसे ( वय 19 रा. जयभवानीनगर जनता वसाहत, दत्तवाडी) अशी पोलीस कोठडी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत मोहन सुभाष पाटील ( वय 35 रा. जेल क्वार्टर्स, येरवडा ) यांनी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. पाटील हे तुरुंगअधिकारी आहेत. सहा जुलै रोजी सकाळी येरवडा जेलच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या भिंतीला लागून असलेल्या पार्किंगसमोर हा प्रकार घडला. फिर्यादी हे सकाळी जेल ओपनिंग ड्युटीसाठी घरातून पायी निघाले होते. जेलच्या भिंतीच्या पार्किंगसमोर आले. त्यावेळी समोरुन आलेल्या दोन दुचाकीस्वारांनी त्यांच्या समोर येवून गोळीबार केला. फिर्यादी यांनी त्यांच्या हातातील छत्री फेकली. ते आक्रमक झालेले पाहून दुचाकीस्वार पळून गेले. याप्रकरणी चौकशी करुन वाडकर याला प्रथम ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याच्या इतर साथीदारांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी गुन्ह्यातील पिस्तुल जप्त करण्यात आला आहे. तो कोठून आणि कोणाकडून आणला. घटनेचा मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी चौघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील
वामन कोळी यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने चौघांना पोलीस कोठडी सुनावली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)