तुरुंगातील शिखांच्या मुक्ततेसाठी टाकीवरून उडी मारणाऱ्या गुरुबख्शचा मृत्यू

कुरुक्षेत्र (हरियाणा) – तुरुंगातील शिखांच्या मुक्ततेसाठी आंदोलन करणाऱ्या गुरुबख्श सिंह खालसा याने पाण्याच्या टाकीवरून उडी मारल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. वेगवेगळ्या तुरुंगामध्ये आपली शिक्षा भोगून झाल्यानंतरही कैदेत असलेल्या शिखांच्या मुक्ततेसाठी गुरुबख्श सिंह खालसा याने मंगळवारी पाण्याच्या टाकीवर चढून आमरण उपोषण सुरू केले होते. मिळालेल्या माहितीनुसार बुडैल तुरुंगात कैदेत असलेल्या भाई गुरुमीत सिंह आणि भाई समशेर सिंह यांच्या सुटकेसाठी तो उपोषणाला बसला होता.

यापूर्वीही 13 नोव्हेंबर 2013 रोजी आणि 13 नोव्हेंबर 2014 रोजी त्याने याच कारणासाठी उपोषण केले होते. पण 44 अणि 65 दिवसांच्या उपोषणांनंतरही त्याच्या हाती आश्‍वासनांशिवाय काही लागले नाही. उलट त्याच्यावर दबाव आणला गेला. अखेर आज त्याने आपल्या प्रयत्नांचा शेवट आपल्या प्राणत्यागाने केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)