तुरडाळ 35 रूपये किलोनेच…

पाकिटावर मात्र 55 रूपये छापील दर
मुंबई – रेशनदुकानांवर तूरडाळ प्रतिकिलो 35 रूपये दराने विकण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला आहे. रेशनदुकानांवर शिल्लक असलेल्या तूरडाळीच्या पाकिटांवर 55 रूपये प्रतिकिलोचा दर छापलेला असला तरी त्यावर 35 रूपये किलोचा स्टीकर लावून रेशनदुकानदारांना तूरडाळ विकायची आहे. तशा सूचना रेशनदुकानदारांना देण्यात आल्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जे रेशन दुकानदार या आदेशाची अंमलबजावणी करणार नाहीत त्यांच्याविरुध्द कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रांतील अधिकृत शिधावाटप दुकानदाराने तांदूळ, गहु, केरोसीनचे ई-पॉस मशिनद्वारे धान्य वितरण करताना शासनाने दिलेल्या निर्देशानुसार वितरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमान्वये, मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात लाभार्थी निश्‍चित करुन शहरी भागातील सध्याचा बीपीएल शिधापत्रिका व्यतिरिक्त एपीएल (केशरी) शिधापत्रकांमधून कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा 59 हजार रुपयांपर्यंत असलेल्या लाभार्थ्यांमधून प्राधान्य गटातील लाभार्थी म्हणून नोंद करण्यात आलेली आहे.

-Ads-

मुंबई तसेच ठाणे शिधावाटप क्षेत्रांतील अधिकृत रेशन दुकानांतून ई- पॉस मशिनद्वारे धान्य वाटपामध्ये पारदर्शकता आणून कोणताही लाभार्थी अन्नधान्यपासून वंचित राहणार नाही व अन्नधान्याची जादा दराने विक्री केली जाणार नाही. तसेच रेशनकार्डधारकांना शिधाजिन्नसांची विक्री केल्यानंतर पावती देण्याबाबत सूचना अधिकृत रेशन दुकानदारांना देण्यात आलेल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)