तुम हो तो हम है…!! (प्रभात शॉर्ट फिल्म कॉर्नर)

आज ७२ वा स्वातंत्र्य दिन. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या आणि रोज आपल्या रक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना मानवंदना देण्याचा दिवस. स्वातंत्र्याच्या ७२ वर्षानंतरही आज जम्मू-काश्मीर अशांत आहे. पाकिस्तानकडून रोज होणाऱ्या शस्त्रसंधीचे उल्लंघन, अतिरेकी कारवाया, घुसखोरी रोखण्यासाठी देशाच्या रक्षणासाठी अनेक जवान शहीद होत आहेत. परंतु अनेक वेळा काश्मीरमध्ये शहिदांच्या ऐवजी अतिरेकी कारवाया करणाऱ्यांचे समर्थन केले जाते. यावेळी जवानांच्या मनात काय येत असेल, हे या शॉर्ट फिल्मद्वारे दाखविण्यात आले आहे.

‘तुम हो तो हम है’ या शॉर्ट फिल्मची सुरुवात एका सीमेवरील चौकीवरच्या तीन जवानांच्या संवादाने सुरु होते. यातील एक सैनिक घरची आठवण येत असल्याने रडत असतो. त्याचे रडण्याचे कारण समजताच अन्य दोन जवान त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करता. यावेळी त्यातील एक जवान म्हणतो. माझ्या मुलाने मला स्वत:च्या हाताने पत्र लिहले असून त्यात या दिवाळीवेळी बॉम्ब आमच्या सोबत फोडा, शत्रूंसोबत नाही, असे लिहलेले असते. तर दुसरा म्हणतो मी एकदा युद्ध संपवून घरी गेलो असता माझ्या आईचा देहांत झाला होता. तेव्हापासून मातृभूमीच्या रक्षणासाठी लढत आहे. तुझ्याकडे तरी तुझी आई आणि मातृभूमी मिळून दोन माता आहेत.

यानंतर देशात होणाऱ्या चर्चेने ते दुखी होतात. आणि म्हणतात, आपण येथे अतिरेक्यांना मारत आहोत, सर्जिकल स्ट्राईक करत आहोत, आणि देशतील नेते त्या स्ट्राईकचे पुरावे मागतात. आपलीच लोक अतिरेक्यांचे समर्थन करतात. आणि त्यांच्या समर्थनार्थ मोर्चे काढत ऑनलाईन पिटीशन साईन करतात. आतातर म्हणतात आर्मीमध्ये लाच देऊन सैनिक येतात. कधी कधी वाटते सोडून निघून जावे, असे म्हणून ते तीनही सैनिक त्यांची चौकी सोडून जातात. आणि रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ३-४ घुसखोर पाकिस्तानच्या हद्दीतून भारताच्या सीमेत प्रवेश करतात. कोणी न पाहून ते पुढे चालण्यास लागता. तेवढ्यात ते तीनही भरतीय जवान त्यांना मागून गोळ्या घालतात.

दिव्येंश त्रिपाठी दिग्दर्शित या चित्रपटाला आतापर्यंत २ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. आपले सैनिक कधीच आपल्या कर्तव्याला चुकत नाही. परंतु काही समाजकंटक त्यांच्या नावाची बदनामी करतात.

– श्वेता शिगवण 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)