तुम मुझे पार्किंग दो.. मै तुम्हे सिमेंट रोड दूंगा

पुणे : महापालिकेकडून शहरात “पे ऍन्ड पार्क’चा प्रस्ताव लागू करण्यात आला आहे. सुरुवातीला हा प्रस्ताव मंजूर करण्यास भारतीय जनता पक्षाचाच विरोध होता. मात्र, मंगळवारीच्या स्थायी समिती बैठकीत तो अचानक मंजूर करण्यात आला. तसेच, तो मुख्यसभेतही मान्यतेसाठी आणण्यात आला. त्याचवेळी आयुक्तांनीही भाजप सदस्यांच्या आग्रहाखातर सिमेंट रस्त्यांचे परिपत्रकात बदल केला. त्यामुळे ‘तुम मुझे पार्किंग दो.. मै तुम्हे सिमेंट रोड दूंगा’ अशी डील झालेली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या पुर्वीही आयुक्तांनी सादर केलेल्या सायकल योजनेस भाजपने विरोध केला होता. त्यावेळी सत्ताधारी भाजपने एका अतिरिक्त आयुक्ताच्या रिक्तपदी पालिका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची अट घातली होती. ते शक्‍य नसल्याने आयुक्तांनी थेट हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार, मंजूर करून घेतला होता. आता मात्र, दोघांनी एकमेकांच्या मागण्या मान्य केल्याने ही तडजोड करण्यात आल्याची चर्चा महापालिकेत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)