तुम्ही प्रत्येक सेशन मध्ये 5 बळी घेऊ शकत नाही – जसप्रीत बुमराह

साऊथहॅम्टन: भारत आणि इंग्लंड दरम्यान होत असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय वेगवान गोलंदाजांनी चांगली सुरूवात केल्यानंतर इंग्लंडला कमी धावांमध्ये रोखण्यात अपयशी ठरल्याने इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात सर्वबाद 246 धावांपर्यंत मजल मारली. दरम्यान पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पहिल्या डावात 3 गडी बाद करणारा भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह म्हणाला की, आमची पहिल्या सत्रात गोलंदाजी चांगली झाली मात्र त्यानंतर सॅम करन आणि मोईन अलियांनी चांगला खेळ करत इंग्लंडचा डाव सावरला, तुम्ही प्रत्येक सत्रात 5 बळी घेऊ शकत नाहित हे खरे आहे.

चौथ्या कसोटीत पहिल्या दोन सत्रात भारताने चांगली कामगीरी केली मात्र, चहापानानंतर सॅम करनने आक्रमक पवित्रा करताना वेगाने धावा करण्यास सुरवात केली. त्याने एक बाजू लावून धरताना शानदार 78 धावा केल्या. करनने मोईन अलीच्या साथीत सातव्या विकेला 81 धावा जोडल्या. मोईन अलीला अश्विनने टिपले. त्यानंतर आलेला स्टुअर्ट ब्रॉडने सुद्धा त्याला चांगली साथ दिली असून त्यांनी आठव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी पार केली. त्यांच्या या कामगिरीमुळे इंग्लंडला सन्मान जनक धाव संख्या उभारता आली.

या विषयी पुढे बोलताना बुमराह म्हणाला कि, त्यांनी खरच चांगली कामगिरी केली, त्यांनी चांगली भागिदारी करण्यावर भर दिला त्यामुळे आम्हाला त्यांचे बळी मिळविण्यात अपयश आले. त्यांनी संथ आणि चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. ते जेंव्हा फलंदाजी करायला उतरले तेंव्हा चेंडू जुना झाला होता आणि चेंडू स्विंग होत नव्हता त्यामुळे गोलंदाजांना त्यात करण्यासारखे काहिच नव्हते. त्यातच करनने धावांचा वेग वाढवताना काहि सुरेख फटके मारत इंग्लंडला सन्मानजनक धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

पुन्हा नो बॉलवर विकेट घेतल्याने बुमराह झाला ट्रोल

बुमराहच्या चेंडूवर कर्णधार जो रूट पायचीत झाल्याचे अपील भारतीय खेळाडूंनी केले. पण पंचांनी त्याला नाबाद ठरवल्यानंतर भारताने ऊठडचा वापर केला. पण या ऊठडमध्ये बुमराहने नो बॉल टाकल्याचे निष्पन्न झाले आणि भारताने मिळविलेली संधी गमावली. सोबतच रिव्ह्यूदेखील फुकट गेला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना पाचव्या दिवशी संपला. हा सामना भारताने 203 धावांनी जिंकला. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 9 बळी गमावले होते. एका बळीसाठी पाचव्या दिवसाचा खेळ खेळावा लागला होता. हा सामना चौथ्या दिवशीच संपू शकला असता, पण जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर एक गडी बाद झाला असताना तो नो बॉल असल्याचे निष्पन्न झाले होते.
त्यावेळी बुमराहवर सोशल मीडियावरून टीका झाली होती. आजही या नो बॉलनंतर पुन्हा एकदा सोशल मीडियातून त्याच्यावर टीका झाली. तसेच तो विनोदाचा विषयही ठरला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)