तुम्हाला तुरुंगात का टाकू नये? – एनआरसी अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

नवी दिल्ली – तुम्हाला तुरुंगात का टाकू नये? असा सवाल सर्वोच्च न्यायालयने एनआरसीचे अध्यक्ष प्रतीक हजेला यांना केला. हजेला यांच्या वृत्तत्रांत आलेल्या मुलाखतबाबत सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी जाहीर केली आहे. एनआरसी तयार करणे एवढेच तुमचे काम आहे. प्रसार माध्यमांकडे जाणे तुमचे काम नाही.

न्यायालयाची अवमानना केल्याबद्दल तुम्हाला तुरुंगात का टाकू नये? असा सवल करत भविष्यात अधिक सतर्क राहून न्यायालयाच्या आदेशानुसर काम करावे अशी ताकिद न्यायालयाने प्रतीक हजेला आणि रजिस्ट्रार जनरल यांना दिली आहे.

-Ads-

नवीन दस्तावेज द्या, पुष्कळ संधी देऊ असे सांगणारे तुम्ही कोण? तुमचे काम केवळ रजिस्टर तयार करणे एवढेच आहे. मीडियला माहिती देण्याचे नाही. हजेला यांच्या वृत्तपत्रात आलेल्या मुलाखतीवर न्यायालयाने तीव्र नापसंती व्यक्त करून म्हटले की, तुम्हाला आम्ही तुरुंगात पाठवू शकतो पण आम्ही स्वत:;ला आवरले आहे. हजेला यांच्या वृत्तपत्रातील निवेदनाची न्यायालयाने स्वत: दखल घेऊन सुनावणी सुरू केली आहे. न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी हजेला यांची वृत्तपत्रात आलेली मुलाखत दाखवली. जी प्रक्रिया अद्याप न्यायालयाने ठरवायची आहे, त्याबाबतीत हजेला यांनी मुलाखत दिली. न्यायालयाच्या अवमाननेची ही योग्य केस आहे. असे न्यायालयाने म्हटले आहे.

हजेला यांनी न्यायालयाची माफी मागितली आणि आरजीआयच्या सल्ल्यावरूनच आपण मीडियाकडे गेलो असा खुलासा केला.

या प्रकरणाची पुढील सुनावणी 16 ऑगस्ट रोजी होणार आहे. या बाबतीत केंद्र सरकारने एसओपी (स्टॅंडर्ड ऑपरेशन प्रोसीजर) सादर करायची आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)