तुम्हाला तुमच्या वक्तव्याची लाज वाटायला हवी-डायना हेडन

नवी दिल्ली : माजी मिस वर्ल्ड डायना हेडन हिने त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देब यांना त्यांच्या वक्तव्यावरून सडेतोड उत्तर दिले आहे.  मुख्यमंत्री देब यांना आपल्या वक्तव्याची लाज वाटायला हवी, या कमेंट दुखावणाऱ्या आहेत, असे डायनाने म्हटले आहे. लहानपणापासून आपण गोऱ्या रंगाला दिल्या जाणाऱ्या प्राथमिकतेविरुद्ध आणि त्या मानसिकतेविरुद्ध लढा दिल्याचंही डायना हेडन हिने म्हटले आहे. ‘हे खूप दुखावणारं आहे. जेव्हा तुम्ही जगातील सर्वात मोठी आणि सर्वात सन्मानित सौंदर्य स्पर्धा जिंकता, देशाचा मान वाढवता… गव्हाळ रंगांच्या भारतीय सुंदरतेला मान मिळवून देण्यासाठी कौतुक करायचे सोडून तुम्ही त्यावर टीका करता’ असेही डायना हिने म्हटले.

दरम्यान, त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव कुमार देब यांनी थेट सौंर्दय स्पर्धांवरच प्रश्न उपस्थित केले होते. डायना हेडन हिला देण्यात आलेल्या ‘मिस वर्ल्ड’ पुरस्काराबाबत त्यांनी टीका केली. तिचा विजय हा फिक्स असल्याचा त्यांनी आरोप केला होता. तर ऐश्वर्या राय बच्चन हिच्या सौंदर्यांचे कौतुक करत तिला दिलेला ‘मिस वर्ल्ड’चा किताब योग्य असून तीच खऱ्या भारतीय महिलांचे प्रतिनिधीत्व करत आहे, असे देब यांनी म्हटले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

1 COMMENT

  1. वरील वृत्त वाचण्यात आले ह्या दोन्ही व्यक्तींनि व्यक्त केलेल्या विचारांची किंवा करावीशी वाटते तसेच सोंदर्य स्पर्धा आयोजित करायचीच असेल तर ती बुद्धीच्या कवशल्यावरच आधारित असावयास हवी कारण बुद्धी म्हणजे ज्ञान व योग्य ज्ञान म्हणजेच ईश्वर परंतु वरील स्पर्धा हि शरीरीराच्या सुंदर दिसण्यावर जरी असली तरी ह्या शरीराची निर्मिती चे आमच्या संतशास्त्रदयानी चांगला दिसणारा देह म्हणजे चामड्याचे नरकुंड आहे इतर कुंडे धुवून स्वच्छ करता येतात पण हे देहाचे कुंड कितीही स्वच्छ, शुद्ध केलेतरी अस्वच्छ , अशुध्दच राहते हाडांचा पिंजरा , शिर्यानाड्यांची गुंडाळी ,मेद मासाचे लिंपण मल मूत्र खफ घाम शेम्बवुड लाल आणि ज्याचे नावही अशुद्ध आहे त्या रक्ताचे हे कोठार आहे आणि ह्या शरीरात सूक्ष्म किडे भरलेले असतात नाक कान डोळे तोंड यांची थोडावेळ निगा ठेवली नाही तर घाण असह्यहोते पोटात पोटात चांगले आन घातले तरी त्याचे मलमूत्र होते नाहीतर वांती होते राजा जरी असला तरी त्याच्या पोटी विष्ठा असणारच निरोगी देहाची हि अवस्था तर रोग झाल्यावर होणारी दुर्धर दशा झाल्यावर विचारावयासच नको तेव्हा अशा ह्या देहाच्या सॊन्दर्य स्पर्धेचे आयोजन करण्याची गरजच काय ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)