तुमच्या स्वत:च्या फोटोला अशाप्रकारे बनवा ‘व्हॉटसअॅप स्टीकर’

इमोजी नंतर आता स्टीकर सुध्दा यूजरच्या पसंतीस पडले आहे. हे लक्षात घेता व्हॉटसअॅपने चॅटिगचा अंदाज बदलण्यासाठी अॅपमध्ये स्टीकर हे फीचर आणले आहे. अनेकवेळा व्यक्ती लिहण्याऐवजी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी स्टीकर किंवा इमोजीचा वापर करतात. अशातच तुमच्या डोक्‍यात स्वत:चे स्टीकर क्रिएट करण्याचा विचार येत असेल तर आज आम्ही तुम्हाला त्याबलच काही महत्वाच्या स्टेप्स सांगणार आहोत.

दरम्यान, व्हॉटसअॅपच्या लेटेस्ट व्हर्जन 2.18 मध्ये इमोजी सेक्‍शनमध्ये स्टीकर पर्याय उपलब्ध झाला आहे. नवीन अपडेट सोबत एक स्टीकर पॅक मिळेल, पण बिल्ट इन स्टीकर स्टोर मधून तुम्ही तुमच्या पसंतीचे अन्य स्टीकर सुध्दा सहज डाउनलोड करू शकता. स्टोर मध्ये गुगल प्ले मधून स्टीकर डाउनलोड करण्याचा सुध्दा ऑप्शन आहे. स्टीकर क्रिएट करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की तुमच्या मोबाइलमध्ये व्हॉटसअॅपचे लेटेस्ट व्हर्जन सोबत इंटरनेट असणे गरजेचे आहे. तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्सच्या मदतीने तुमचा स्वत:चा फोटो हा स्टीकरमध्ये बदलू शकता.

-Ads-

स्टीकर क्रिएट करण्याच्या स्टेप्स :

1) सर्वात आधी गूगल प्ले स्टोर मधून स्टीकर मेकर अॅप डाउनलोड करा.
2) स्टीकर मेकर अॅप इंस्टॉल झाल्यानंतर अॅप ओपन करा. अॅपमध्ये दिसणा-या क्रिएट न्यू स्टीकर पॅकवर क्‍लिक करा.
3) यानंतर विचारलेली माहिती उदा. स्टीकरचे नाव आणि स्टीकरपॅक ऑथर भरा.
4)डिटेल्स पूर्ण भरल्यानंतर स्टीकर पॅक ओपन करा, त्यानंतर तुम्हाला काही बॉक्‍स दिसतील.
5) सर्वात वरच्या बाजूला दिसणा-या ट्रे ऑयकन बॉक्‍सवर क्‍लिक करा. आता तुमच्यासमोर दोन पर्याय ओपन होतील- एक म्हणजे स्वत: चा फोटो काढू शकता किंवा मोबाइल मध्ये उपलब्ध फोटो सिलेक्‍ट करू शकता. फोटो सिलेक्‍ट करण्यापूर्वी अॅप तुमच्याकडून फोन एक्‍सेस करण्याची परमिशन मागेल.
6) त्यानंतर फोटोमधील जेवढा भाग तुम्हाला पाहिजे तेवढी आउटलाइन काढल्यानंतर सेव्ह स्टीकरवर क्‍लिक करा.
7) ट्रे आयकॉन इमेज सेट झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, स्टीकरपॅकमध्ये तुम्ही 30 कस्टम स्टीकर्स जोडू शकता. नवीन स्टीकर जोडण्यासाठी तुम्ही फोटो काढू शकता किंवा मग फोनमधील स्टोर फोटो वापरू शकता.
8) तुमचे स्टीकर बनवून पूर्ण झाले असेल तर खाली दिलेल्या पब्लिश स्टीकर पॅक वर क्‍लीक करा. त्यानंतर येस आणि कॅन्सल हे दोन पर्याय दिसतील. त्यापैकी येस वर क्‍लिक करा. येस वर क्‍लिक केल्यास नवीन स्टीकर तुमच्या व्हॉटसअॅपमध्ये उपलब्ध होईल.
9) आता तुम्हाला दिसेल की व्हॉटसअॅपमध्ये इतर स्टीकर्स सोबत तुम्ही बनविलेले स्टीकर सुध्दा उपलब्ध असेल.

– स्वप्निल हजारे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)