तुमच्या काळातील कर्जांचा तपशील जाहीर करा: चिदंबरम

नवी दिल्ली: बॅंकांच्या बुडित कर्जाचे खापर युपीए सरकारवर फोडणाऱ्या मोदी सरकारवर पलटवार करताना माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी मोदी सरकारला तुमच्या काळात मंजूर झालेली आणि नंतर ती बुडित ठरलेल्या कर्ज प्रकरणांची यादी जाहीर करण्याचे आवाहन केले आहे.

या संबंधात ट्विटर अकौंटवरून मोदी सरकारवर पलटवार करताना चिदंबरम यांनी म्हटले आहे की युपीए सरकारच्या काळात दिली गेलेली कर्ज बुडित ठरल्याचा आरोप मोदी सरकार आत्ता करीत आहे पण ही कर्जे वसुली करण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले ते जाहीर करावे असे आव्हानही त्यांनी दिले. मे 2014 नंतर दिली गेलेली आणि बुडित ठरलेली कर्जे किती तेही या सरकारने जाहीर करावे असे त्यांनी म्हटले आहे. हेच प्रश्‍न संसदेतही विचारले गेले होते पण त्याची उत्तरे सरकारकडून मिळू शकली नाहींत.

पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना युपीए सरकारच्या काळात दिल्या गेलेल्या 12 मोठ्या कर्ज प्रकरणांची यादी वाचून दाखवली. यातील 1 लाख 75 हजार कोटी रूपयांची कर्जे बुडाली आहेत असे त्यांनी म्हटले आहे. नामदारांच्या एका फोन कॉलवरून ही कर्जे दिली गेली असा आरोपही मोदींनी केला होता. त्यावर चिदंबरम यांनी म्हटले आहे की समजा ही कर्जे युपीए सरकारच्या काळात दिली गेली पण त्या कर्जांचे पुनरूज्जीवन का केले गेले असा प्रश्‍नही त्यांनी मोदींना विचारला आहे. ही कर्जे परत येणार नाहीत याची कल्पना असतानाही ती दिली गेली असा आरोप मोदींनी केला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)