तुमच्या कारभाराचे वाभाडे जनतेसमोर आणणार

लक्ष्मी कऱ्हाडकर यांना विनोद बिरामणे यांचा इशारा

पाचगणी, दि. 15 (प्रतिनिधी) – आमचा विरोध शहर विकासाला नसून विकसाच्या नावाखाली सुरू असलेल्या लुटीला आहे. लोकांना जास्त दिवस आपण खोटे बोलून फसवू शकत नाही, त्यामुळे नगराध्यक्ष लक्ष्मी कऱ्हाडकर तुमचे काऊंट डाऊन आता सुरू झाले आहे. तुमच्या कारभाराचे वाभाडे जनतेसमोर आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते विनोद बिरामणे, नारायण बिरामने यांनी दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लक्ष्मी कऱ्हाडकर यांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण आणि स्थायी समितीच्या सभेत कास्टिंग व्होटच्या जोरावर विरोधकांचा विरोध मोडून काढत सर्व विषय मंजूर करून घेतले. यावेळी त्यांनी विरोधक अतिमहत्वाकांक्षेने शहर विकासाला विरोध करीत असल्याचा आरोप विरोधी गटावर केला होता. याप्रकरणी आयोजित पत्रकार परिषदेत विनोद बिरामणे बोलत होते. यावेळी नारायण बिरामणे, विजय कांबळे,अनिल वन्ने, पृथ्वीराज कासुर्डे, सौ. रेखा कांबळे, सौ. रेखा जानकर, सौ. निता कासुर्डे, सौ. हेमा गोळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

बिरामणे म्हणाले, आमचा शहर विकासाला विरोध असल्याच्या वावड्या उठवून लोकांसमोर स्वतःची प्रतिमा उजळण्याचा प्रयत्न कऱ्हाडकर यांच्याकडून सुरू आहे. पाचगणीचा फार मोठा विकास केल्याचा त्यांचे म्हणणे पूर्णपणे फसवे असून केवळ स्वतःच्या आणि बगलबच्च्यांच्या हिताचेच निर्णय सध्या पाचगणीत सुरू आहेत.
पालिकेने आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हलसाठी मुख्य बाजारपेठेतील हेरिटेज इमारती रंगविण्यासाठी तब्बल 14 लाखांहून अधिकचा निधी खर्च केला आहे. सुमारे 300 स्क्वेअर फुटासाठी हा निधी म्हणजे 45 हजार प्रति स्केवर फीट दर देणे म्हणजे एखाद्या गर्भश्रीमंताकडे रंगकाम करण्यासारखे आहे.
नगराध्यक्षांकडून जाणीवपूर्वक अपूर्ण माहिती देणे, पालिका हिताचे विषय डावलने असे प्रकार सुरू आहेत. पाचगणीच्या घोड्यांना बिल्ला देण्यासाठी देखील असाच गोलमाल केल्याचा उल्लेख देखील या पत्रकार परिषदेत आवर्जून केला. पालिकेने गटारे साफ करण्यासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा ठेका दिला आहे.

सदर ठेकेदारकडे अवघे 4 कामगार आहेत. पाचगणीतील गटारे उतारावर असल्याने गटारे वारंवार तुंबत नाहीत. तरीही एवढा मोठा ठेका देण्यामागे काय गौडबंगाल असा थेट सवाल या नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. पाचगणी पालिकेतील सर्व गैरव्यवहार जनतेसमोर मांडणार असल्याचा इशारा देखील या सर्वांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. कऱ्हाडकरांचा कारभार म्हणजे पाऊस कुठे पण पडू द्या पाणी यांच्याच तळ्यात येणार, कारण ठेकेदार यांचे पगारी कामगार असल्याचा गंभीर आरोपही यावेळी बिरामणे यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)