तुमचे वजन कमी करून पक्षाचे वजन वाढावा; नायडूंचा रेणुका चौधरींना सल्ला

नवी दिल्ली – काँग्रेस खासदार रेणुका चौधरी कायमच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात, दरम्यान काल  रेणुका चौधरी यांच्यासह अनेक खासदारांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानं त्यांना निरोप देण्यात आला.या प्रसंगी पराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आपल्या भाषणाच्या वेळी  रेणुका चौधरी यांच्या नावाचा उल्लेख केला आणि पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या.

निरोपाचे भाषण करताना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी  म्हटले की, रेणुका चौधरींना मी बऱ्याच कालावधीपासून ओळखतो. त्यांचे वजन आत्ता आहे त्यापेक्षा कमी होते तेव्हापासून त्या मला माहित आहेत.  नायडू यांनी असे म्हटल्यावर रेणुका चौधरींनीही त्यांना प्रत्युत्तर दिले, व्यंकय्या नायडू मला माझे वजन कमी असल्यापासून ओळखतात. माझ्या वाढलेल्या वजनाची त्यांना खूपच चिंता आहे. मात्र जेव्हा तुम्ही राजकारणात येता तेव्हा तुमचे राजकीय वजन जास्तच असले पाहिजे.

चौधरी यांनी असं म्हणताच व्यंकय्या नायडू म्हणाले की, मी तुम्हाला गंमतीत सल्ला दिला होता तुम्ही तुमचे वजन कमी करा आणि पक्षाचे वजन वाढवण्यासाठी प्रयत्न करा. नायडू यांनी हे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. काँग्रेस पक्षाचे वजन योग्य आहे असे प्रत्युत्तर यांवर रेणुका चौधरी यांनी दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)