तुटलेल्या वीज तारेच्या शॉकने चार जनावरे दगावली

आळंदी-तुटलेल्या वीज वाहक तारेचा शॉक लागून गोलेगाव पिंपळगाव येथील चार जनावरे मृत पावली. ही घटना रविवारी दुपारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास घडली. यामध्ये दोन म्हशी, एक रेडा आणि एक वासरू अशा जनावरांचा समावेश आहे. सुमारे सव्वा तीन लाख रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती आळंदी पोलिसांनी दिली.
गोलेगाव पिंपळगावच्या हद्दीत वीज वाहून नेणारी तार तुटलेली होती. याठिकाणी तुटलेला तारेला चिकटल्याने चार जनावरांचा जागीच मृत्यू झाला. गोलेगाव पिंपळगाव येथील सोपान अमृता शेळके यांच्या मालकीची ही जनावरे आहेत. दरम्यान आळंदी पोलीस ठाण्यातील जमादार महेश साळुंके यांनी घटनास्थळी जाऊन या घटनेचा पंचनामा करत पोलीस ठाण्यात नोंद केली आहे. वास्तविक गेली वर्षभरापासून गोलेगाव पिंपळगाव येथे लोंबकळणाऱ्या वीज वाहक तारांचा प्रश्न आहे. अनेकदा वीज मंडळाला सांगूनही लोंबकळणाऱ्या तारा दुरूस्त केल्या नाहीत. दरम्यान रविवारी दुपारी गोलेगाव येथील अनेक जनावरे सामूहिकपणे चरत होती. यावेळी अचानक वीज वाहक तारांमधे स्पार्क झाला आणि तार तुटून जमिनीवर पडली. यावेळी त्याठिकाणी चरत असलेल्या चार जनावरांना शॉक लागला आणि जागीच काळवंडून मृत झाल्या. येथील काही लोकांनी इतर जनावरे त्याठिकाणी जाण्यापासून रोखल्याने आणखी काही जनावरे दगावण्यापासून वाचली. अन्यथा आणि पशूधनाचे नुकसान झाले असते.

  • आज सुट्टी आहे उद्या बघू
    दरम्यान गोलेगाव पिंपळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी यांनी घटनास्थळी मृत पावलेल्या जनावरांचा पंचनामा करण्यासाठी पशूवैद्यकिय अधिकाऱ्यांना संपर्क केला असता आज सुट्टी आहे, उद्या बघू. असे उत्तर देण्यात आल्याचे श्री. चौधरी यांनी सांगितले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)