तुघलकी निर्णयाने सामान्यांचं जीवन उद्ध्वस्त ; नोटबंदीवरून राष्ट्रवादीचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई: भाजप सरकारने दोन वर्षांपूर्वी नोटबंदीचा निर्णय घेतला होता. नोटबंदीला दोन वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने विरोधकांनी मोदी सरकारवर सोशल मीडियावर हल्ला चढविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने व्यंगचित्राच्या माध्यमातुन भाजपवर टीका केली. यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था बुडतांना दाखवली आहे.

“दोन वर्षांपूर्वी गरीबांनी निगुतीनं जपून ठेवलेल्या नोटा मातीमोल ठरल्या. हक्काच्या पैशासाठी जनता बँकेचे उंबरठे झिजवून दुबळी झाली. नोकर्‍या गेल्या, व्यवसाय बुडाले, अर्थव्यवस्थेचं चाक रुतलं, काळा पैसा तर आला नाहीच, पण या तुघलकी निर्णयाने सामान्यांचं जीवन उद्ध्वस्त केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.

दोन वर्षांपूर्वी गरीबांनी निगुतीनं जपून ठेवलेल्या नोटा मातीमोल ठरल्या. हक्काच्या पैशासाठी जनता बँकेचे उंबरठे झिजवून…

Posted by Nationalist Congress Party – NCP on Wednesday, 7 November 2018


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
1 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)