तुकोबांच्या पालखी सोहळ्यासाठी बारामती सज्ज

जळोची- पंढरपूर आषाढी वारीसाठी जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळ्याचे शुक्रवारी (दि. 13) बारामती तालुक्‍यात आगमन होणार असून शनिवारी (दि. 14) बारामती शहरात मुक्कामी असणार असून या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती नगरपालिका प्रशासनाने दिली.
पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना आरोग्य सेवा, वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा मुबलक प्रमाणात व वेळेत होण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनतर्गत काम करण्यात येणार आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी निवारा, दिवाबत्ती, पाणीपुरवठा, स्वच्छतागृहे यांची व्यवस्था करण्यात आली आहे. बारामती शहरात रस्त्यांच्या साईड पट्ट्यावरील गवत काढून स्वच्छ करण्यात आले. शहरातील हॉटेल, हातगाडेधारकांना स्वच्छता, पिण्याच्या पाण्याबाबत नोटीसा देण्यात आल्या. तसेच पालखी मुक्कामी (शारदा प्रांगण) येथील मैदान स्वच्छ व खड्डे बुजवण्यात आली. परिसरात धूर फरवारणी करण्यात सुरुवात केली आहे. शहरांतील 48 सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या स्वच्छतागृहांची दुरुस्ती व स्वच्छ करण्यात असून हॉटेल, मंगल कार्यालये, पेट्रोल पंप, शाळा अशा सार्वजनिक ठिकाणची स्वच्छतागृहे वारकर्यांना खुले करण्याबाबत नोटीसा देण्यात आल्या असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. सोहळ्यात सहभागी असलेल्या दिंड्यांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज असल्याचे मुख्याधिकारी योगेश कडूसकर यांनी सांगितले.

गेली 10 वर्षांपासून दोन्ही पालखी सोहळ्याला 250 रिकामे बॉक्‍स कचरा साठवण्यासाठी देतात. त्यामुळे वारकरी कचरा इतरत्र टाकत नसल्यामुळे शहरांत स्वच्छता राहण्यास मदत होते. समाजसेवा हीच खरी पांडुरंगाची खरी सेवा आहे. आपले शहर स्वच्छ ठेवण्यात वेगळे समाधान आहे. त्यामुळे हर्षद पॅकवेल हि मोहीम राबवीत असल्याचे दिलीप दोशी यांनी सांगितले. नगरपालिकेचे नियोजन समिती अध्यक्ष बिरजू मांढरे म्हणालेकी, पालखी प्रमुख यांच्याशी चर्चा करून आवश्‍यक ती कार्यवाही तयारी करण्यात आली आहे. पालखी सोहळ्याच्या कार्यक्रमपत्रिकेप्रमाणे मुक्कामाच्या ठिकाणांची नगरपालिकेने नियोजन केला असल्याचे त्यांनी नमूस केले.

  • तुकोबांच्या पालखीच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे. सभामंडप उभारण्यात आला आहे. आरोग्य व पिण्याच्या पाण्याबाबत योग्य नियोजन बारामती नगरपालिकेने केले आहे.
    – पौर्णिमा तावरे, नगराध्यक्षा, बारामती नगरपालिका

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)