तुकाराम मुंढेंविरोधातील अविश्वास प्रस्ताव बारगळला

नाशिक – नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव अखेर मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर भाजप नगरसेवकांनी मुंढेंविरोधातील अविश्वास ठराव मागे घेतला. मुख्यमंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्तक्षेपामुळे नगरसेवक बॅकफूटवर गेल्याचे चित्र आहे.

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात शनिवारी 1 सप्टेंबरला अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी सत्ताधारी भाजपने केली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक भाजपला झटका देत तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याचे आदेश नगरसेवकांना दिले होते. यानंतर नगरसेवकांनी हा ठराव अखेर रद्द केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठरावाचे हत्यार उपसल्याने, ते बॅकफूटवर गेल्याचे चित्र आहे. ज्या करवाढीचा मुद्‌दा पुढे करुन मुंढे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव महासभेवर ठेवण्यात आला, ती करवाढ मुंढे यांनी काही अंशी मागे घेतली.

आयुक्तांच्या या निर्णयामुळे नाशिककरांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. मुंढे यांनी नवीन दर जाहीर केल्याने राजकीय पक्ष काय भूमिका घेतात त्याकडे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)