तुकाराम भुसे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

चिंबळी- मरकळ (ता. खेड) येथील केशवराज शिक्षण संस्थेचे संचालित नविन माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयाचे वरिष्ठ लेखनिक व सतत सामाजिक व धार्मिक उपक्रम राबविणारे तुकाराम श्रीहरी भुसे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त नुकताच सत्कार करण्यात आला असल्याचे विद्यालयाचे अध्यक्ष वसंत लुनकर यांनी सांगितले. दरम्यान, अनिल लोखंडे यांच्याहस्ते सेवानिवृत्त वरिष्ठ लेखननिक तुकाराम भुसे यांचा शाल श्रीफळ व प्रतिमा विद्यालयाच्या वतीने गुणगौरव करण्यात आला, त्यावेळी लुनकर बोलत होते. यावेळी सेवानिवृत्त भुसे यांनी एक सामाजिक व शैक्षणिक कार्य म्हणून विद्यालयास 25 हजार 555 रूपये देणगी दिली. याप्रसंगी विद्यालयाचे अध्यक्ष व माजी प्राचार्य वसंत लुनकर, उत्तम जगताप, प्रार्चया नादीरा शाह, सुरेश घुले जालिंदर पिगंळे, प्रर्यवेशक शंकर सुतार, दशरथ लोखंडे, काळूराम लोखंडे, सरपंच स्वाती लोखंडे, उपसंरपच उमेश वर्फे, रोहीदास लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य सचिन लोखंडे, लाला लोखंडे, सुभाष खादंवे, हनुमंत लोखंडे, गणेश लोखंडे आदि मान्यवरांसह सर्व शिक्षकवृंद, पालक विद्यार्थ्यी, कर्मचारी संचालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्गशिक्षिका छाया लाटे यांनी केले तर ज्येष्ठ शिक्षक उत्तम जाधव यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)