“ती’ बांधकामे नियमित करावीत

पिंपरी – प्राधिकरण हद्दीतील भोसरी भागातील भगत वस्ती, धावडे वस्ती, गुळवे वस्ती परिसरातील अनियमित बांधकामे नाममात्र दंड आकारून नियमित करावीत, असे साकडे भाजप नगरसेवक राजेंद्र लांडगे व रवी लांडगे यांनी प्राधिकरणाला घातले.

यासंदर्भात प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब लांडगे, सोमनाथ लांडगे, रोहिदास वाबळे, हनुमंत तावरे, दत्तात्रय लांडगे, श्रीकृष्ण तावरे, अर्जुन केसरी, अशोक वाघमारे, राजकुमार गोंड, दशरथ पवळे, कांतीलाल रणपिसे, तानाजी भोंडवे, सुनील भोपळे, अजित जाधव आदी उपस्थित होते.

यासंदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्राधिकरण हद्दीतील मिळकती पुर्ण मोबदला देवून खरेदी केल्या आहेत. त्याबाबतचे दस्त देखील आहेत. मात्र, तांत्रिक बाबींमुळे या मिळकतींवर बांधकामास परवानगी दिली जात नाही. त्यामुळे स्वःमालकीच्या मिळकती असूनही त्यावर स्वखर्चाने उभारलेली बांधकामे अनधिकृत ठरत आहेत. काही जणांनी कर्ज काढून मिळकती घेतल्या व त्यावर बांधकाम केले. काहींनी दागिने मोडले. तर काहींनी गावाकडील मिळकती विकून याठिकाणी मिळकत खरेदी केली.

गरीब कामगार, अल्प उत्पन्न गटातील नागरीक व मजुरी करुन उपजिविका करणाऱ्या कामगारांनी याठिकाणी घरे बांधली आहेत. या बांधकामांना महापालिकेने नागरी सुविधा पुरविल्या आहेत. त्यांच्याकडून मिळकत कर, पाणीपट्टी व इतर प्रकारचे सर्व कर वसूल केले जातात.

प्राधिकरणाकडून ही बांधकामे नियमित केली जात आहेत. मात्र, त्यासाठी आकारले जाणारे शूल्क अवाजवी व अन्यायकारक आहे. पीएमआरडीएने अनधिकृत बांधकाम नियमितीकरणासाठी पाच टक्के इतका दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर प्राधिकरणाने पाच टक्‍के दंड आकारुन ही घरे नियमित करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)