“ती’ नांदायला जाण्यापूर्वीच नवरदेवाचे पलायन

वाल्हे-ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर सैराट प्रेम कहाण्या रंगत असताना पिसुर्टी येथील प्रेमीयुगलांनी आणाभाका घेऊन लग्नाआधीच शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. मात्र, प्रियकाराने लग्नास टाळाटाळ केली. मात्र, पोलिसांनी खाक्‍या दाखवताच अखेर पोलीस ठाण्याच्या समोरील देवळात लग्नही झाले. नांदायला जाण्यापूर्वीच वरराजा फरार झाल्याने पुन्हा नवरदेवावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याची घटना उघड झाली आहे.
पिसुर्टी येथील शालेय विद्यार्थिनीशी आपल्या वाहनातून सोडण्याच्या बहाण्याने प्रेमसंबध निर्माण करणारा सागर महावीर चोरमले याने प्रेमाच्या आणाभाका घेऊन प्रियसी सोबत शरीरसंबध प्रस्थापित केले होते. त्यातून तिला दिवस गेल्याने प्रेमाच्या आणाभाका घेत मुलीला “गर्भपात कर मी लग्न करतो’ असा तगादा लावला… विनातक्रार गर्भपातही झाला… नाती-गोती जुळली. मात्र, मुलाच्या घरातून विरोध झाला. पोलीस ठाण्यात मुलाला पोलिसी खाक्‍या दाखवल्याने पुन्हा नवरदेव वटणीवर आला. जेजुरी पोलीस ठाण्याच्या समोरील विठ्ठल मंदिरात आई वडिलांच्या साक्षीने पोलिसांच्या सांगण्यावरून गळ्यात माळा घालून शुभविवाह उरकला. पोलीस ठाण्यामधून होणारी बिदाई ताणलेल्या वादाने दोन दिवसांवर पुढे ढकलली. साहेबांनी आश्‍वासन दिले मी पोरगी नांदायला धाडतो, पण दोन दिवसांनी प्रेमीराजा फरार झाला आणि सात दिवसांनी रंगली बलात्काराची कहाणी.
10 ऑगस्ट रोजी आपली मुलगी गायब झाल्याची फिर्याद देणाऱ्या पित्याने 11 ऑगस्टला जेजुरी पोलिसांच्या मध्यतीने जुवळच्याच मंदिरात लग्न लावले. यावेळी पोलिसांनीही चांगले होईल अशी आशा होती. मात्र, नवरदेवाने मुलीला नांदविण्यास नकार दर्शविल्याने पोलिसांनीही 17 ऑगस्टला बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या मध्यस्थीने लग्न करून बसलेलेल्या मुलीच्या नशीबी नवऱ्याच्या विरोधातच बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची वेळ आली आहे. पोलिसांचा विलंबपणा मुलीच्या जीवनात संभ्रम निर्माण करणारा ठरला. असल्याने पोलिसाकडे कोणी जावे की नाही असा प्रश्‍न मुलीच्या आई व वडिलांनी व्यक्‍त केला आहे. पोलिसांनी हे प्रकरण पत्रकारापासून लपवून ठेवल. मात्र, पोलिसांच्या अंगलट आल्यानंतरही मुलीच्या पित्याची ससेहोलपट पोलिसांनी केल्याचा आरोप लाला कोंडिबा बरकडे यांनी केला आहे. तर पोलिसांनी पैशाचा बाजार मांडून गुन्ह्यातील आरोपीला पळण्यास संधी दिल्याचे मत पत्रकारासमोर त्यांनी व्यक्‍त केले आहे.

  • या प्रकरणातील मुलगा व मुलगी एकाच समाजातील आहे. त्यामुळे ज्यावेळी हे प्रकरण पोलीस ठाण्यामध्ये आले होते तेव्हाच आम्ही गुन्हा दाखल करण्याच्या मानसिकतेत होतो. मात्र, मुलाचे आणि मुलीच्या घरातले आणि नातेवाईक एकत्र आले. त्यांच्यामध्ये विचारविनिमय झाला. त्यानंतर त्यांनी कुठल्यातरी मंदिरात एकमेकांना हार घातला. त्यांच्या लग्नामध्ये पोलिसांचा काहीही रोल नाही. मात्र, त्यानंतर तो मुलगा फरार झाला आहे. त्यानंतर मुलीचे नातेवाईक पोलीस ठाण्यात आले. त्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
    – रामदास वाकोडे, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे जेजुरी
  • झिरोने घेतले मुलींच्याकडून पाच हजार
    वाल्हे पोलीस ठाण्यातील झिरो पोलिसाने मुलीच्या वडिलांकडून पाच हजार रूपये घेतले व मुलीच्या लग्नाचे हार घातलेले फोटो दिले होते. मात्र, काही दिवसांतच नवरदेव फरार झाल्याची घटना कळल्याने या झिरोने साडेचार हजार रूपये मुलीच्या चुलत्याला परत केल्याने मुलाच्या बाजूने जास्त पैसे दिले असावेत, असा आरोप मुलींच्या घरच्यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)