“ती’ जिद्दच आपल्याला घडविते – नाना शिवले

चिंचवड – आपण ज्यांच्या संपर्कात येतो त्या मित्रांचा, लोकांचा आपल्या जीवनावर प्रभाव पडत असतो. याकरिता संगत महत्त्वाची असते. एक चांगलं आयुष्य जगण्याची तीव्र इच्छा बाळगा. काहीतरी मोठं करून दाखविण्याची जिद्द हीच आपल्याला चांगला माणूस म्हणून घडविते, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले यांनी व्यक्त केले.

वाल्हेकरवाडी येथील प्रेरणा शाळेच्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या सदिच्छा समारंभात नाना शिवले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक कैलास पवळे होते. याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक संजय शितोळे, गौतम दळवी, रतन गायकवाड, सुनिता गोरे, हनुमंत सोनवणे, अंकुश सुळ, योगिता साखरे, अनुजा शेवाळे, रेणुका शिवतारे, सुनील चौगुले आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नाना शिवले पुढे म्हणाले की, आपल्या जीवनाचे ध्येय ठरवा. चांगल्या पुस्तकांमधून, शिक्षकांकडून व मोठ्या माणसांकडून सतत ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा. मेहनत आणि शिस्तबद्ध जीवन यांच्या आधारे आपल्या ध्येयाच्या दिशेने पावले टाकत राहा. आपण ठरवलेल्या मार्गावर न थांबता निर्धाराने एक सारखे चालत रहा. मेहनतीला पर्याय नाही, असे सांगत त्यांनी अनेक प्रेरणादायी उदाहरणे दिली.

सायली पांडव, हर्षा भोसले, पूजा देवतरासे, आकांक्षा काशिद, साक्षी खटाटे, सोनाली जगताप, प्राजक्ता गरंडे, प्रथमेश तपसे, शुभम आढाव, नाजीम पठाण या विद्यार्थ्यांनी शालेय आठवणी सांगत शाळा व शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. मुख्याध्यापक कैलास पवळे, संजय शितोळे, सुनीता गोरे, रतन गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आणि करिअरसाठी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन तेजस्विनी सपकाळे व पायल धोडमनी या विद्यार्थिनींनी केले. प्रास्ताविक गौतम दळवी यांनी केले. आरती पाटील हिने आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)