ती क्‍लिप माझीच – मुख्यमंत्री

मुंबई – शिवसेनेने जाहीर केलेल्या कथित आँडीओ क्‍लिपवरून मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला चोख प्रत्युत्तर दिले आहे. होय ती आँडिओ माझीच आहे. पण, पराभव दिसतोय म्हणूनच शिवसेना खालच्या पातळीवर उतरली आहे, अशी चपराक देवेंद्र फडणवीस यांनी लगाविली.

फडणवीस म्हणाले, जनतेची दिशाभूल करण्यासाठी शिवसेनेने माझी ऑडिओ क्‍लिप मोडून-तोडून सादर केली. ही संपूर्ण ऑडिओ क्‍लिप 14 मिनिटांची आहे. मी स्वत: ती क्‍लिप निवडणूक आयोगाकडे देणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
वसईच्या प्रचारसभेदरम्यान त्यांनी ही संपूर्ण क्‍लिप ऐकवली. तसेच शिवसेनेने त्यांना हवी तशी ऑडिओ क्‍लिप एडिट केल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.

साम, दाम, दंड, भेद याचा अर्थ कूटनिती असा होतो, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. सत्ता पक्ष आहोत, सत्तेचा कधीही दुरुपयोग करणार नाही, असे या क्‍लिपमधील शेवटचे वाक्‍य होते. मात्र ते त्यांनी दाखवले नाही. ते दाखवले असते, तर शिवसेना तोंडावर पडली असती, असे मुख्यमंत्री म्हणाले.

भंडारा-गोंदियामध्ये आचारसंहितेचा भंग
भंडारा-गोंदियामध्ये सहा महिन्यापूर्वी झालेल्या शेतीच्या नुकसानीची भरपाई निवडणूक आचारसंहिता काळात ट्रेझरीमध्ये जमा करून मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. भाजप भंडारा-गोंदियामध्ये साम-दाम-दंडभेदाचा वापर करून पोटनिवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असून शासकीय नुकसानभरपाई देण्याचा प्रयत्न संबंधित यंत्रणेकडून केला गेला हा आचारसंहितेचा भंग आहे. त्यामुळे आचारसंहितेचा भंग करणाऱ्या आणि भाजपला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)