तीव्र बद्धकोष्ठता आणि आतड्यांचे आजार (भाग-१)

डॉ. राजेंद्र माने 
आतड्यांवरील अनियंत्रणावर उपचार करताना त्यामागील कारणांचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. गुदद्वार आणि ओटीपोटीचे स्नायू मजबूत करण्याचे आणि आतड्याचे कार्य सुरळीत ठेवण्याचे अनेक उपाय आहेत. 
आतड्यांवरील अनियंत्रणावर उपचार करताना त्यामागील कारणांचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. गुदद्वार आणि ओटीपोटीचे स्नायू मजबूत करण्याचे आणि आतड्याचे कार्य सुरळीत ठेवण्याचे अनेक उपाय आहेत. अनेकदा स्नायू आणि नसा पूर्ववत करून आणि स्नायू उत्तेजित करून आतड्यांवरील अनियंत्रण टाळता येते. 
आतड्यातील अनियमितता म्हणजे मलविसर्जनावरील नियंत्रण संपुष्टात येणे. कधीकधी होणाऱ्या गळतीपासून याची सुरुवात होते आणि त्यानंतर आतड्यांमध्ये होणाऱ्या हालचालींवरील नियंत्रण संपुष्टात येते. पाठीच्या कण्याला दुखापत झाल्यानंतर किंवा गुदाशयावरील शस्त्रक्रियेदरम्यान झालेल्या गुंतागुंतीमुळे हा विकार होण्याची शक्‍यता असते. आतड्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मलाविसर्जनाबाबत जाणीव होण्याची आणि त्याला जाणिवेला प्रतिसाद देण्याची शारीरिक आणि मानसिक क्षमता आवश्‍यक असते. त्यासाठी गुदाशय, गुदद्वार, ओटीपोटीचे स्नायू आणि मज्जासंस्थेने व्यवस्थित कार्य करणे आवश्‍यक असते. 
प्रौढाचा विचार केल्यास आतड्यांवरील नियंत्रण कमी होण्याचा त्रास महिलांना अधिक प्रमाणात होतो. गुदद्वाराची नलिका आणि स्फिन्क्र (गुदद्वार समाकुंचनी) भागातील नसा आणि स्नायूंना इजा झाल्याने हा विकार उद्‌भवू शकतो. मलाशय आणि मेंदूला जोडणाऱ्या नसांमध्येदेखील समस्या असू शकते. त्यामुळे गुदाशयामध्ये मल असल्याची जाणीव शरीराला होत नाही. त्यामुळे स्फिन्क्र भागातील नसांवर नियंत्रण ठेवणे कठीण होते. पाठीच्या कण्याला किंवा स्ट्रोकमुळे झालेल्या दुखापतींमुळे नसांना इजा पोहोचू शकते. कधी कधी प्रसूतीच्या वेळी झालेल्या आघातामुळे श्रोणीभागात निर्माण झालेल्या समस्यांमुळे आतड्यांवरील संयम गमावला जाऊ शकतो. योनीमागार्तून मूल जन्मल्यानंतर गुदाशयातील स्फिन्क्र किंवा त्या भागातील नसांवर परिणाम होतो. त्यामुळेच आतड्यांमधील अनियमितता पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये दुपटीने आढळून येते. 
तीव्र बद्धकोष्ठतेमुळे गुदद्वार आणि आतडे कमकुवत होते. यामुळेदेखील आतड्यांमध्ये अनियमितता येते. गुदद्वार आणि आतडे कमकुवत झाल्याने अतिसार आणि मलगळती होण्याचादेखील धोका असतो. तीव्र रेचकांचा वापर, मोठ्या आतड्याचा काही भाग काढून टाकणे किंवा आतड्यांवरील शस्त्रक्रिया, मलमार्ग भरल्याबद्दल जाणीव न होणे, मानसिक समस्या, स्त्रीरोग, पुरस्थग्रंथी किंवा गुदद्वाराची शस्त्रक्रिया, मुलाला जन्म देताना गुदद्वाराला झालेली दुखापत, आघातामुळे नसा आणि स्नायूंना झालेली इजा, ट्युमर किंवा रेडिएशन यामुळेही आतड्यांच्या नियंत्रणावर परिणाम होऊ शकतो. 

तीव्र बद्धकोष्ठता आणि आतड्यांचे आजार (भाग-२)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
1 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)