तीव्र बद्धकोष्ठता आणि आतड्यांचे आजार (भाग-२)

डॉ. राजेंद्र माने 
आतड्यांवरील अनियंत्रणावर उपचार करताना त्यामागील कारणांचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. गुदद्वार आणि ओटीपोटीचे स्नायू मजबूत करण्याचे आणि आतड्याचे कार्य सुरळीत ठेवण्याचे अनेक उपाय आहेत. 
कधीकधी गंभीर स्वरूपाच्या अतिसारामुळे मलवाहिनीवरील नियंत्रण सुटल्यामुळे, मूळव्याध किंवा मलमार्गच्या प्रारंभीच्या भागावर झालेल्या दुखापतींमुळे, ताण किंवा अपरिचित वातावरणामुळेदेखील आतड्यांमध्ये अनियमितता येते. आतड्यांमधील हालचाली सुरळीत राहण्यासाठी मलमार्ग आणि गुदद्वार यांच्यातील नसा आणि स्नायूंमध्ये समन्वय आवश्‍यक असतो. ज्यावेळी गुदद्वार आतड्यांमध्ये हालचाल होऊ देते, त्यावेळी स्फिन्क्रचे नियंत्रण असते. मात्र यातील एखादा अवयव योग्यपणे काम करत नसल्यास आतड्यांमध्ये अनियमितता निर्माण होऊ शकते. 
जर तुम्हाला घरातील लहान मुलामध्ये किंवा प्रौढ व्यक्तीत मल नियंत्रण नसल्याचे आढळून आल्यास तातडीने डॉक्‍टरांचा सल्ला घ्या. कधीकधी आतड्यांच्या नियंत्रणाच्या अभावी त्वचेत जळजळ निर्माण होते. यासोबतच त्वचेवर फोडदेखील येतात. आतड्यांवरील नियंत्रण असलेल्या व्यक्ती भीतीमुळे आणि लाज वाटत असल्याने सामाजिक कार्यांमध्ये सहभाग घेत नाहीत. औषधे, शस्त्रक्रिया यांच्यामुळे आतड्यांवरील अनियंत्रणावर उपचार शक्‍य आहेत. 
आतड्यांवरील अनियंत्रणावर उपचार करताना त्यामागील कारणांचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. गुदद्वार आणि ओटीपोटीचे स्नायू मजबूत करण्याचे आणि आतड्याचे कार्य सुरळीत ठेवण्याचे अनेक उपाय आहेत. 
अनेकदा स्नायू आणि नसा पूर्ववत करून आणि स्नायू उत्तेजित करून आतड्यांवरील अनियंत्रण टाळता येते. इतर देशांमध्ये हे अनियंत्रण टाळण्यासाठी स्नायू उत्तेजित केले जातात. वैद्यकीय इलेक्‍ट्रिकल उत्तेजन प्रक्रियेतून नसा उत्तेजित केल्या जाऊ शकतात. अनियंत्रणावर उपचार करण्यासाठी वापरली जाणारी ही पद्धत अद्याप उपलब्ध झालेली नाही. अनेकदा आतड्यांमधील अनियमिततेमुळे लोकांना लज्जास्पद वाटते. वाढत्या वयाच्या तक्रारी म्हणून लोक याकडे बघतात. मात्र काही नव्या पद्धतींमुळे लक्षणे थांबवली जाऊ शकतात आणि परिस्थिती पूर्ववत होऊ शकते. वैद्यकीय उपायांनंतरही अनियमितता कायम राहिल्यास, शस्त्रक्रियेचा पर्याय निवडता येऊ शकतो. दुखापत झाली असल्यास ओटीपोटीच्या नसांसह स्फिन्क्रवर उपचार केले जाऊ शकतात. 
आतड्यांमधील अनियमितता टाळण्यासाठी योग्य आहार अतिशय आवश्‍यक आहे. दररोज 20 ते 30 ग्रॅम तंतूमय पदार्थांचे सेवन केल्यास त्यामुळे मल अवजड होते आणि त्यामुळे नियंत्रित केले जाऊ शकते. कॅफिनचे सेवन टाळल्यास अतिसार रोखला जाऊ शकतो. यासोबतच बद्धकोष्ठतेचा त्रास टाळण्यासाठी दररोज भरपूर पाणी प्या. व्यायाम केल्यामुळेही आतड्यांमधील अनियमितता टाळता येऊ शकते. मूत्रावर नियंत्रण आणण्यासाठी व्यायाम (ओटीपोट, श्रोणीभागाचे व्यायाम) करता येऊ शकतो. यामुळे ओटीपोटीचे स्नायू मजबूत होतात आणि आतड्यांमधील अनियमितता कमी करतात. योग्यवेळी आतड्याच्या हालचालींसाठी आवश्‍यक व्यायाम केल्यास अनियमितता टाळता येऊ शकते. 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)