तीव्र उन्हामुळे भुईमूग पडतोय पिवळा

चिंबळी- खेड तालुक्‍यात औद्योगिक क्षेत्रात असलेल्या चिंबळी परिसरात शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामातील घेतलेल्या भुईमूग पिकावर हवामानाच्या लहरीपणामुळे परिणाम होत असून, पीक पिवळे पडू लागले आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच कडक उन्हाळा सुरू झाला आहे. पहाटे गार हवा आणि त्यानंतर जसेजसे उन वाढेल तसेतसे वातावरण तापत आहे. रात्रीच्या वेळी पुन्हा काही काळ गारवा आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम पिकांवर होत असून, शिवारातील पिके पिवळी पडू लागली असल्याने शेतकरी चिंतेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)