तीव्र उन्हामुळे अंगाची लाही लाही

निमसाखर – कडक उन्हामुळे इंदापूर तालुका तापले असून पारा 38 सेल्सिअस अंशावर गेला गेला आहे. यामुळे अंगातून घामाच्या धारा वाहत असून उकाडयापासून मुक्ती मिळवण्यासाठी ए.सी.कुलर,पंख्यांचा वापर वाढला आहे. तर शीत पेयांच्या स्टॉलवर गर्दी होत आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे उष्म्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. सकाळी आठ वाजल्यापासूनच उन्हाचे चटके बसत आहेत. यामुळे घराबाहेर पडताना उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांकडून टोपी, गॉगल, छत्री, सनकोटचा वापर केला जात आहे. थंडावा मिळण्यासाठी शीतपेयांच्या स्टॉलवर गर्दी होत आहे. तर रणरणत्या उन्हामुळे दुपारी 1 ते 4 या वेळेत रस्त्यावर तुरळक गर्दी दिसत आहे. दरम्यान, कडक उन्हाच्या पार्श्‍वभूमीवर परिसरातील रस्त्यासह विविध दुकानात आता टोप्या, गॉगल्स, चष्मे, रूमाल, सनकोट, स्टोल, मास्क, हॅन्डग्लोज विक्रीसाठी आले असून त्यांच्याकडे खरेदीसाठी नागरिक गर्दी
करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)