तीर्थक्षेत्र देहूत तळीरामांचा उच्छाद वाढतोय

देहुरोड – तीर्थक्षेत्र देहू येथील रिंग रोड आणि इंद्रायणी नदी घाट परिसर तळीरामांचा अड्डा बनला आहे. मद्य प्राशनानंतर रस्त्यात रिकाम्या बाटल्या फोडल्या जात आहेत. वारंवार होणाऱ्या या प्रकारांमुळे ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले आहेत. तीर्थक्षेत्र देहू येथे भरणाऱ्या वर्षभरातील तीन मोठ्या यात्रेतील वाढत्या भाविकांची गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर परिसरातील वाहतूक कोंडी आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत गावाबाहेरून रिंग रोड तयार करण्यात आला आहे. या रिंग रोडवर अद्यापही पथदिवे बसवले नसल्याने रात्री अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. तसेच या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात शेत जमिनी आहेत. सायंकाळी अंधार पडल्यानंतर या मार्गावरच ठिकठिकाणी तळीरामांचे अड्डे बनले आहेत. मद्यप्राशनानंतर तळीराम रिकाम्या बाटल्या शेतात व इतरत्र फेकत आहे. तर रस्त्यांवरच फोडत असल्याने वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शेतात उभ्या पिकांचे नुकसान होत आहे.शेतकऱ्याना शेत काम करताना इजा पोहचत आहे. त्याचप्रमाणे इंद्रायणी नदी घाटावर ठिक-ठिकाणी मद्य प्राशनानंतर तळीराम रिकाम्या बाटल्या नदीपात्रात फेकत आहेत. त्यामुळे नदीपात्रातील मासे व स्नान विधी करणारे भाविकांना इजा पोहोचण्याचे शक्‍यता नाकारता येत नाही. अशा तळीरामांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)