तीर्थक्षेत्र देहूतील अतिक्रमणे पुन्हा “जैसे थे’

देहुरोड – तीर्थक्षेत्र देहू येथील भाविकांची सुरक्षितता राखणे आणि वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी शासनाने अतिक्रमणावर कारवाईचा बडगा उगारत अतिक्रमणे हटविले. मात्र पालखी सोहळा परण्यापूर्वीच पुन्हा “जैसे थे’ झाल्याने सुज्ञ नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

तीर्थक्षेत्र देहूगाव येथे तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंर्तगत विविध कामे झाली आहेत. तर अनेक कामे सुरू आहेत. अरूंद रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी ग्रामस्थांनी बाधीत क्षेत्रातील बांधकामे स्वतःहून हटवित शासनाला सहकार्य केले. रस्त्याचे रुंदीकरण करीत दुतर्फा पदपथ बांधण्यात आले. पादचाऱ्यासांठी बांधलेल्या या पदपथांवर हातगाड्या, पथारीवाले, टपऱ्या, व्यापाऱ्यांच्या अतिक्रमणाने पदपथांची चोरी झाली की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. तर व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांच्या रस्त्यांवरच उभ्या वाहनांनी रस्ते अरूंद झाले होते. संत तुकाराम महाराज यांच्या 333 व्या आषाढी वारी निमित्त भाविकांच्या सुरक्षितता राखणे आणि वाहतूक कोंडींचा प्रश्‍न सोडविण्यासाठी शासनाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने तीर्थक्षेत्र देहू येथील अतिक्रमणावर कारवाईचा बडगा उगारत अतिक्रमणे हटविल्याने पदपथांसह रस्त्यांनी मोकळे श्‍वास घेतला होता.

-Ads-

मात्र पुन्हा अतिक्रमणे करू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे ग्रामपंचायतीने फक्‍त फलक उभारले आहेत. या फलकांवरील आदेशाला केराची टोपली दाखवित पुन्हा अतिक्रमणे झाली आहे. झालेल्या या अतिक्रमणाकडे ग्रामपंचायत प्रशासन, सरपंच, उपसरपंच, सदस्यांनी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत डोळेझाक केले आहे. त्यामुळे अतिक्रमणे पुन्हा वाढत असल्याने समस्यांची परिस्थिती “जैसे थे’ झाल्याने एखादी मोठी दुर्घटना अथवा अपघात घडल्यास ग्रामपंचायत प्रशासनावर कारवाई करण्यात यावी , अशी मागणी विविध संघटनांसह सुज्ञ करण्यात येत आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)