तीर्थक्षेत्र देहुमध्ये संत तुकोबाराय जन्म सोहळ्याची काल्याच्या कीर्तनाने सांगता

देहुरोड, (वार्ताहर) – श्री संत तुकाराम महाराज संस्थानने श्री संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने सांगता केली. यावेळी गाथा पारायण करणाऱ्या सुमारे 300 जणांना 14 टाळकरी यांची प्रतिमा देण्यात आली.

संत तुकोबारायांचा माघ शु ।। वसंत पंचमी हा जन्म दिन प्रतिवर्ष श्री संत तुकाराम महाराज संस्थान, पंचक्रोशीतील विविध सामाजिक, धार्मिक संस्था, प्रतिष्ठान तसेच भाविक, वारकरी, ग्रामस्थ यांनी उत्साहात साजरा केला. संस्थानच्या वतीने मुख्य मंदिरातील भजनी मंडपात कीर्तन महोत्सव सप्ताहास सोमवार दि. 22ला सुरुवात झाली. संत तकाराम महाराजांच्या पाहती गवळणी। तव ती दुधाणी पालती।। अभंगाने संभाजी महाराज देहूकर यांचेकाल्याच्या कीर्तनाने सोमवार दि. 29 ला सप्ताहाची सांगता करण्यात आली. या वेळी सुमारे तीन हजार भाविक उपस्थीत होते.

-Ads-

संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, विश्‍वस्त सुनील दिगंबर मोरे, सुनील दामोदर मोरे, विठ्ठल मोरे, अभिजित मोरे, जालिंदर मोरे, अशोक मोरे यांच्या हस्ते मुख्य मंदिरात पहाटे 4 वाजता काकडा, पाच वाजता महापूजा झालीे. गाथा डोक्‍यावर घेऊन भाविकांनी ग्राम प्रदक्षिणा करून मुख्य मंदिरात दिंडी प्रदक्षिणा केली. त्यानंतर गाथा पारायणाची सांगता झाली. सप्ताहात गाथा पारायण करणाऱ्या सुमारे 300 भाविकांना महाराजांच्या कीर्तनातील 14 टाळकरी यांची प्रतिमा देण्यात आली. काल्याच्या कीर्तनानंतर भाविकांना संस्थानच्या वतीने महाप्रसादाचे वाटप झाले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)