तीन हजार लिटर डिझेल व दोनशे लिटर पेट्रोलची चोरी

जामखेड – जामखेड तालुक्‍यातील हळगावमध्ये अज्ञात चोरट्यांनी चक्क तीन हजार लिटर डिझेल व दोनशे लीटर पेट्रोलवर डल्ला मारण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे तालुक्‍यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात जामखेड पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकीकडे पेट्रोल व डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत असतानाच चोरांनी आता थेट पेट्रोल व डिझेल चोरी करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की हळगाव येथे जामखेड-चोंडी रस्त्यावर जामखेडच्या दिशेने तात्याराम काळे यांचा दत्त पेट्रोल पंप आहे. चोरट्यांनी या पेट्रोल पंपाच्या मागील बाजूने पंपापासून 30 ते 35 फूट अंतरावरून पंपाच्या स्टॉकटाकीत पाईप टाकले. मोटारीच्या साह्याने स्टॉक टॅंकमधून चक्क तीन हजार लिटर डिझेल व 200 लीटर पेट्रोलवर डल्ला मारला. ही घटना आठ ऑक्‍टोबर रोजी पहाटे घडली. या चोरीत चोरट्यांनी अडीच लाख रुपयांचे पेट्रोल, डिझेल चोरून नेले आहे. एवढी मोठी चोरी होत असताना हा प्रकार कुणाच्याच लक्षात आला नाही.
दरम्यान, 9 ऑक्‍टोबर रोजी पेट्रोल पंपाच्या स्टॉकची माहिती घेत असताना डिझेल व पेट्रोलची चोरी झाल्याची बाब समोर येताच एकच खळबळ उडाली. या चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पेट्रोल कंपनीचा रिपोर्ट आवश्‍यक होता. दहा तारखेला कंपनीकडून तपासणी करण्यात आली. कंपनीने दिलेल्या पत्रानुसार दत्त पेट्रोलियमचे मालक तात्याराम काळे यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास जमादार चव्हाण हे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)