तीन वर्षात 1770 बांगलादेशींची हकालपट्टी

नवी दिल्ली – सरकारने गेल्या तीन वर्षांत 330 पाकिस्तानी आणि 1770 बांगलादेशी घुसखोरांची त्यांच्या देशात हकालपट्टी केली आहे. अशी माहिती केंद्र सरकारतर्फे आज लोकसभेत एका लेखी उत्तरात देण्यात आली. केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजीजु यांनी सांगितले की विदेशी नागरीक कायद्यातील कलम 3 (2)सी अंतर्गत सरकारला देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या विदेशी नागरीकांना हाकलून देण्याचा अधिकार आहे त्याचा उपयोग करून ही हकालपट्टी करण्यात आली आहे.

देशात नेमके किती बेकायदेशीर बांगला घुसखोर आहेत किंवा किती पाकिस्तानी नागरीक बेकायदेशीर रित्या भारतात घुसले आहेत याची सरकारला कल्पना नाही. ही घुसखोरी गुपचुप आणि संबंधीत अधिकाऱ्यांची नजर चुकवून होत असल्याने सरकारकडे त्याचे रेकॉर्ड नाही. या घुसखोरांकडून काही वेळा कायदा आणि सुव्यवस्था स्थितीलाही बाधा येत आहे अशी माहितीही रिजीजू यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)