तीन वर्षांतील घोटाळ्यांमुळे बॅंकांना 70 हजार कोटी रूपयांचा फटका

नवी दिल्ली – भारतातील बॅंकांना गेल्या तीन वर्षांत भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांमुळे तब्बल 70 हजार कोटी रूपयांचा फटका बसला आहे. सरकारतर्फे राज्यसभेत ही माहिती देण्यात आली. अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्‍ला यांनी या विषयीची आकडेवारी सादर केली. ते म्हणाले की सन 2015-16 या वर्षात 16 हजार 409 कोटी रूपयांचा, सन 2016-17 या वर्षात 16 हजार 652 कोटी रूपयांचा आणि सन 2017-18 या वर्षात 36 हजार 694 कोटी रूपयांचा फटका बॅंकांना बसला आहे.

ज्या वर्षात हा फ्रॉड नोंदवला गेला आहे त्याच वर्षात संबंधीत व्यक्तीला कर्ज मंजुर झाले आहे असे नव्हे तर त्याच्या आधी मंजुर झालेली कर्जे नंतर बुडवण्यात आल्याचा प्रकार घडला आहे असेही मंत्र्यांनी नमूद केले. बॅंकांकडून लोकांना दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या रकमेत मोठी वाढ झाल्याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले की बॅंकांकडून लोकांना विविध प्रकारची तब्बल 68 लाख 75 हजार कोटी रूपयांची कर्जे वितरीत करण्यात आली आहेत.

-Ads-

बॅकांमधील कर्जबुडवेपणा किंवा घोटाळे वाढण्याची अनेक कारणे आहेत त्यात आर्थिक मंदी हेही एक प्रमुख कारण असल्याची माहिती मंत्र्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)