तीन वर्षांची चिमुरडी रस्ता चुकते तेव्हा…!

पिंपरी – भोसरीमध्ये आईने मोबाइल काढून घेतल्यामुळे चक्क साडेचार वर्षाची चिमुरडी घरातून रागाने निघून गेली आणि रस्ता चुकल्याने हरविली. सर्वत्र तिचा शोध घेतला जात होता, परंतु तिचा काही थांगपत्ता लागत नव्हता. त्यामुळे घाबरलेल्या आई-वडिलांनी अखेर भोसरी पोलीस ठाणे गाठले. मुलगी सापडत नसल्याचे पोलिसांना सांगितल्यानंतर त्यांनी घटना गांभीर्याने पाहत गुन्हे शाखेची मदत घेण्याचे ठरवले. भोसरी पोलीस आणि गुन्हे शाखेच्या टीम अवघ्या काही तासात तिला शोधून काढले.

मोहम्मद हैदर खान (वय-38, रा.भोसरी, मुळ उत्तरप्रदेश) यांची मुलगी आलिया ही शुक्रवार रोजी दुपारी तीनच्या सुमारास खेळता-खेळता घराबाहेर निघून गेली. घरात आई होती. परंतु, आलिया नेहमीच बाहेरील परिसरात खेळत असत, त्यामुळे आईने तिच्याकडे लक्ष दिले नाही. बराच वेळ झाला तरी आलिया घरात आलीच नाही. आईने बाहेर येऊन पाहिले असता आलिया दिसली नाही. तिचा शोध सुरू झाला. आलिया ही खान कुटुंबाची एकुलती एक मुलगी. अलियाचा शोध घेण्यासाठी ते वास्तव्यास असलेले भगतवस्ती परिसर पिंजून काढला. मात्र आलिया काही सापडत नव्हती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहिती नुसार शहरात गेल्या काही दिवसांपासून अपहरणाच्या घटना घडल्या आहेत. या घटनाबाबत खान कुटुंबियांनीही वाचले होते, ऐकले होते. त्यामुळे हे पालक पुरते हादरून गेले. त्यांनी रात्री आठ वाजता भोसरी पोलीस ठाण्यात येऊन याबाबतची माहिती दिली. भोसरी पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेतले आणि 40 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आलियाला शोधायला सुरूवात केली. यामध्ये गुन्हे शाखेच्या पथकालाही सूचना देण्यात आल्या.

आलिया घरातून कुठे गेली असेल याचा शोध घेण्यासाठी रस्त्यावरील प्रत्येक सीसीटीव्ही भोसरी पोलिसांनी तपासला, एका सीसीटीव्हीमध्ये आलिया चालत जात असल्याचे दिसले. भगतवस्तीला लागून असलेल्या एमआयडीसी भागाकडे आलिया चालत गेल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढून 40 जणाचे पथक सर्व बाजूने शोधण्यास सुरुवात केली. एमआयडीच्या एका रस्त्याजवळ एक मुलगी झोपलेली पोलिसांना दिसली. त्या मुलीला खान कुटुंबियांना दाखविले असता हीच आलिया असल्याची खात्री तिच्या आईने केली आणि पालकांबरोबर पोलिसांनी नि:श्‍वास टाकला. ही कामगिरी पोलिस उपनिरीक्षक सोपान देशमुख, प्रमोद कठोरे, सुधीर पाटील, सुमीत देवकर, गणेश हिंगे यांनी पार पाडली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)