तीन लाख रुपये किमतीचे 59 किलो रक्‍तचंदन जप्त

पुणे- एका ह्युंदाई कारमधून 59 किलो वजनाचे रक्तचंदन गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाकडून हस्तगत करण्यात आले. याची किंमत सुमारे 3 लाख 60 हजार इतकी होती. पोलिसांनी ह्यंदाई कारसह 5 लाख 60 हजार 500 रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. तर याप्रकरणी कारचालक राहुल हरिदास इंगळे (30, रा. भुगाव, ता. मुळशी) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्द कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई वन अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. युनिट एकचे नितीन भोसले पाटील यांनी ही कारवाई केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)