तीन लाख तळीरामांकडून मद्य परवाना

31 डिसेंबरचा फिवर : राज्य उत्पादन शुल्क विभागाची माहिती 

पुणे – नववर्षाचे स्वागत करताना मोठा उत्साह असतो. या दिवशी मद्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. 31 डिसेंबरच्या दिवशी मद्य पिण्यासाठी जिल्ह्यातील तीन लाखांहून अधिक तळीरामांनी मद्य परवाना घेतला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नववर्षाचे स्वागत करताना कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात येतो. मद्यप्राशन करून नववर्षाचे स्वागत करण्याकडे कल वाढला आहे. पोलीस प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई होण्याच्या भीतीने तळीरामांकडून एक दिवसाचा मद्य परवाना घेत आहेत. मद्य पिण्यासाठी आयुष्यभर, एक वर्ष, सहा महिने आणि एक दिवस अशा कालावधींसाठी मद्य परवाना दिला जातो. या परवान्यांमध्ये देशी व विदेशी मद्य परवान्यांचा समावेश आहे.

31 डिसेंबरसाठी जिल्ह्यात सुमारे तीन लाखांहून अधिक नागरिकांनी परवाने घेतले आहेत. येत्या दोन दिवसांत आणखी 60 हजार नागरीक परवाने घेतील, असा अंदाज आहे. एक दिवसाचा परवाना शहर आणि जिल्ह्यात कुठेही चालणार आहे. हे परवाने परवानाधारक देशी व विदेशी मद्य दुकानांमार्फत वितरीत करण्यात येतात.

आयुष्यभराच्या परवान्यासाठी एक हजार शुल्क
आयुष्यभरासाठी मद्यपरवाना घेण्यासाठी एक हजार रुपये इतके शुल्क आकारले जाते. वार्षिक मद्य परवान्यासाठी 100 रुपये आणि एक दिवसाच्या मद्य परवान्यासाठी पाच रुपये इतके आकारले जात आहे, अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)