तीन मोबाईल चोर जाळ्यात

पिंपरी – पादचाऱ्याचा मोबाईल फोन हिसकावल्याप्रकरणी तिघेजण पोलिसांच्या जाळ्यात फसले आहेत. थेरगाव येथे ही कारवाई करण्यात आली.

शुभम नितीन काळभोर (वय 18, रा. मोरेवस्ती, भीमशक्ती नगर, झोपडपट्टी, चिखली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर अन्य दोन विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी महेश नारायणदास सोमाणी (वय 22, रा. लोकमान्य कॉलनी, थेरगाव. मूळ रा. जिंतूर, जि. परभणी) यांनी फिर्याद दिली.
तिघांकडून 13 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. आरोपी शुभम याच्यावर पिंपरी, निगडी आणि एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजण, पोलीस उपनिरीक्षक हरीश माने, पोलीस कर्मचारी पोलीस हवालदार रोहिदास टिळेकर, पोलीस शिपाई मयूर जाधव, दत्तप्रसाद चौधरी, शरद दुधाळ यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)