तीन महिन्यांत रिझर्व्ह बॅंकेने केली तब्बल 148 टन सोन्याची खरेदी 

मुंबई: डॉलरसमोर रुपया सातत्याने घसरत असल्याने बाजारात मंदी असताना रिझर्व्ह बॅंकेने जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत 148 टन इतक्‍या सोन्याची खिरेदी केली. तीन महिन्यांच्या कालावधीतील बॅंकेची 2015 नंतर ही सर्वाधिक खरेदी आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने ही माहिती दिली.

कौन्सिलच्या सोमसुंदरम यांनी सांगितले की, भारतासह बहुतांश विकसनशील देशांमधील प्रधान बॅंकांनी डॉलरकेंद्रित अर्थव्यवस्थेवरील अवलंबित्व कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भविष्यात आर्थिक मंदी निर्माण झाल्यास डॉलर विक्रीऐवजी सोने विक्रीतून पैसा उभा करण्याची सोय बॅंकांनी केली आहे. या सोने खरेदीत जुलै-सप्टेंबर 2017 च्या तुलनेत यंदा 22 टक्‍के वाढ झाली आहे. रशिया, कझाकिस्तान, तुर्कस्तानमधील बॅंकांनीही मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जानेवारी ते सप्टेंबर 2018 या कालावधीत जगभरात 3809 टन सोन्याची विक्री झाली. हे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत 2.51 टक्‍के अधिक आहे. दागिन्यांच्या मागणीत चांगली वाढ झाली. पण भांडवली बाजाराशी संबंधित ईटीएफद्वारे होणाऱ्या सोने गुंतवणुकीत जवळपास 21 टक्‍के घट झाली. जुलै ते सप्टेंबर 2017 च्या तुलनेत यंदा भारतात सोन्याची विक्री 10 टक्‍के वाढली. पण जानेवारी ते सप्टेंबर या सहा महिन्यांत यंदा विक्री 1 टक्‍का घटली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)