तीन नवीन पोलीस निरीक्षकांच्या नियुक्‍त्या

पिंपरी – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयात तीन नवीन पोलीस निरीक्षकांच्या नियुक्‍त्या झाल्या आहेत.

निरीक्षकांच्या नियुक्‍तीबाबत पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन यांनी स्वतः आदेश जारी केले आहेत. अहमदनगर पोलीस दलातील सायबर पोलीस ठाण्यातून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयात बदली झालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी चाकण पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे.

पुण्याच्या विशेष शाखेतून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाकडे वर्ग करण्यात आलेले पोलीस निरीक्षक आर. पी. चौधर यांची आळंदीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे. नव्याने हजर झालेले उमेश तावस्कर यांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली असून त्यांच्यावर चाकणच्या वाहतूक विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)