तीन दिवसांत स्वाईन फ्लूचे तीन रुग्ण

तीनही रुग्ण पुण्याबाहेरचे असल्याची आरोग्य विभागाची माहिती
पुणे, दि.9 – सलग तिसऱ्या दिवशीही स्वाईन फ्लूचा रुग्ण सापडल्याने एकूणच स्वाईन फ्लूच्या वाढत्या प्रसाराबाबत चिंता व्यक्‍त केली जात आहे. मात्र हे तीनही रुग्ण पुण्यातील स्थायिक नसून पुण्याबाहेरचे आहेत; परंतु हे पुण्यात राहात असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे कदाचित हे सर्वजण एकाच कुटुंबातील असण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.
जानेवारीपासून आतापर्यंत स्वाईन फ्लूचे 21 रुग्ण सापडले असून त्यातील 15 जणांना उपचारांती घरी ही सोडण्यात आले आहे. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून रोज एक रुग्ण सापडत असल्याने सगळीकडेच भीतीचे वातावरण आहे. गुरुवारी आलेल्या माहितीनुसार आणखी एक रुग्ण बाधीत आढळून आला आहे. दरम्यान, गुरुवारी दिवसभरात 3 हजार 106 रुग्णांची तपासणी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)