तीन तरुणांकडून दोन पिस्तूल जप्त

पिंपरी – खंडणी व दरोडा विरोधी पथकाकडून तीन तरुणांना दोन देशी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसासह अटक करण्यात आली आहे.

ओंकार रमेश हिंगे (वय-19, रा. शिवतेजनगर बिबेवाडी), मंगेश दामु मांजरे (वय-20, रा. ओटा स्कीम, निगडी) व मनिष माधव निदानिया अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पथक निगडी परिसरात गस्त घालत असताना त्यांना ओटा स्कीम येथील विवेकानंद शाळेजवळ एकजण संशयीतरित्या उभा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने सापळा रचत त्याला ताब्यात घेऊन त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस असा ऐवज मिळाला. त्याच्याकडे तपास केला असता त्याने त्याचा मित्र मंगेश यानेही एक पिस्तूल घेतल्याचे कबूल केले. मंगेशकडेही पोलिसांना एक देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस मिळाले. दोघांनीही चार महिन्यांपूर्वी मनिष निदानिया याच्याकडून पिस्तूल विकत घेतले होते. पोलिसांनी या प्रकरणात एकूण 60 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

खंडणी व दरोडा विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक पुरुषोत्तम चाटे, विठ्ठल बढे, पोलीस कर्मचारी गणेश हजारे, अशोक दुधवणे, शरिफ मुलानी, गणेश कोकणे, किरण खेडकर, विक्रांत गायकवाड, शैलेश सुर्वे, आशिष बोटके, प्रवीण माने यांच्या पथकाने ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)