तीन चिमुकलींवर बलात्कार करणारा नराधम ज्येष्ठ जेरबंद

विशेष न्यायालयाने सुनावली त्याला पोलीस कोठडी

पुणे- घरात एकटा असताना परिसरतील तीन चिमुकल्या मुलींना घरात बोलावून त्यांच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी नराधम ज्येष्ठाला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली. त्याला 26 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश आर.व्ही.अदोणे यांनी दिला आहे. दोन पीडित मुली दहा वर्षाच्या आहेत. तर एक 11 वर्षाची आहे.
जॉन जेरी सिद्दैया (वय 65, रा. येरवडा) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. 11 वर्षीय पीडित मुलीने याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. 19 मार्च आणि त्यापूर्वीच्या दोन महिन्यांच्या कालावधीत ही घटना घडली आहे. घरात एकटे असताना तो चिमुकल्यांना बोलावून घ्यायचा. त्याच्यावर बलात्कार करत असल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणी जॉन याला अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी ही घटना समाजाला काळीमा फासणारी आहे. त्याने तीन चिमुकलींवर चाकु दाखवून अत्याचार केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबत अधिक तपास करण्यासाठी, त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी, त्याने आणखी कोणाशी असे कृत्य केले आहे का, पीडित मुलींचा 164 प्रमाणे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवायचा आहे. त्यामुळे त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)