तीन आसनी प्रवासी वाहनाचा विमा गट स्वतंत्र करा 

पुणे- दरवर्षी तीन चाकी रिक्षाच्या प्रचंड प्रमाणात वाढणारा तृतीय पक्ष विम्याचा हफ्ता यंदाही जवळपास दीड हजाराने वाढण्याची शक्‍यता आहे. तसा प्रस्ताव विमा नियामक व विकास प्राधिकरणाने प्रसूत केला आहे. त्यास रिक्षा पंचायत व राज्य रिक्षा संघटना संयुक्‍त कृती समितीने जोरदार हरकत घेतली असून तीन आसनी, तीन चाकी प्रवासी वाहनाचा स्वतंत्र व राज्यनिहाय विमा गट करावा, अशी सूचना प्राधिकरणास केली आहे. देशभरातील तीन चाकी वाहनांनी केलेल्या अपघातांची भरपाई महाराष्ट्रातील रिक्षा चालकांकडून वसूल करू नये, अशीही मागणी केली आहे. समितीचे राज्य सरचिटणीस नितीन पवार यांनी त्या विषयीचे निवेदन प्राधिकरणाच्या महाव्यवस्थापकांना नुकतेच दिले.

कमी जोखीम कमी हफ्ता, जास्त जोखीम जास्त हफ्ता या विम्याच्या मुलभूत सूत्राचा भंग रिक्षा विमा हफ्त्याचे दर ठरवताना होत आहे,असे पंचायतीने नोंदवले आहे. पुणे व महाराष्ट्राचा विचार करता रिक्षांच्या अपघात व नुकसानीचे प्रमाण केवळ 2 ते 3 टक्‍केच आहे. मात्र, विमा हफ्ता दरवर्षी अनेक पटींनी वाढतोय. सध्या तृतीय पक्ष विमा हफ्त्यासाठी वार्षिक सुमारे साडेसहा हजार रुपये रिक्षा चालकाला भरावे लागतात. नियमानुसार ते व इतर कर भरल्याशिवाय रिक्षाचे योग्यता प्रमाणपत्र मिळत नाही. आणि रिक्षा रस्त्यावर धावू शकत नाही. कसलाही परतावा नसलेला विमा हफ्ता म्हणजे पुणे व महाराष्ट्र येथील रिक्षाचालकांची कायदेशीर लुटच आहे.

आता तर त्यात आणखी दीड हजाराने वाढ करायचा प्रस्ताव प्राधिकरणाने प्रसूत केला आहे. त्यावर रिक्षा पंचायतीने आक्षेप घेत वाढ न करण्याची मागणी केलीच. त्याशिवाय सध्याचा केवळ तीन चाकी, सहा आसनापर्यंत असणारा प्रवासी वाहनांसाठीचा असलेला एकच विमा गट, फक्‍त तीन चाकी, तीन आसनीचा स्वतंत्र करा, अशीही सूचना केली आहे. तसेच राज्याबाहेरील तीन ते सहा आसनी वाहनांकडून होणाऱ्या अपघातांची भरपाई महाराष्ट्रातील रिक्षा चालकाला द्यावी लागते. त्यावर उपाय म्हणून तीन आसनीचा राज्यनिहाय विमा गट करावा, अशी मागणी केली आहे.

या निवेदनात मागील वर्षी विमा हफ्त्यावर द्याव्या लागणाऱ्या % सेवाकराची जागा % वस्तू व सेवा कराने घेतली आहे, ती वाढ तसेच कॉल अकॅब मोटारींमुळे घटलेली प्रवासी संख्या याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. या हरकत, सूचना देऊनही विमा दरवाढ केल्यास पंचायतीने न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा मार्गही खुला ठेवला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)